नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही जबर मार लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 5 वा घडली.या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकल चालक युवकाला उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे, नायगाव पोलिसांनी ट्रकसह ट्रकचालकास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत चालू होती.

या बाबत अधिक वृत्त असे की एम एच 26 बी यु 8310 या क्रमांकाच्या मोटारसायकल वर दोन युवक नरसी कडे जात होते.यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणारा ट्रक क्र.बी जे 12 बी ए 8164 ने जबर धडक दिल्याने दुचाकीवर पाठी मागे बसलेला युवक प्रशांत साहेबराव हुलगुलवलवाड वय 21 वर्ष रा. शिंदे गल्ली नायगाव बा.हा जागीच ठार झाला तर समोरचा माधव बालाजी शिंदे वय 22 वर्ष रा.शिंदे गल्ली नायगाव बा.हा जबर जखमी झाला . जखमीस नायगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून नांदेडला हलवण्यात आले आहे.

मयत युवकाचे नायगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन सुरू होते.तर घटनास्थळी नायगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाचावारसाहेब यांनी भेट देऊन पंचनामा केला. सविस्तर माहिती घेतल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि