नातीला दवाखान्यात दाखवून परत येताना आजीचा अपघाती मृत्यू तर नात व सून सुद्धा गंभीर जखमीनायगांव दि 20- नातीला दवाखान्यात दाखवून एक प्रौढ महिला अॅपे आॅटोमधुन घुंगराळा येथे जात असतांना ऑटोचालकाने अचानक ब्रेक मारला व ऑटो पलटी होऊन त्या 60 वर्षीय महीलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना दि.20 फेब्रुवारी रोजी शनिवारी दुपारी दोन ते तीन च्या दरम्यान नांदेड हैदराबाद मार्गावर देगाव शिवारात घडली , या अपघातात दोन जण गंभीर आसल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.

नायगांव तालुक्यातील घुंगराळा येथील इदरबाई गणपत सुर्यवंशी वय (60) , रुक्मिनबाई रघुनाथ सुर्यवंशी(वय 35) ह्या दोघी सासूसुनेसह आजारी असलेली नात दिपाली रघुनाथ सुर्यवंशी वय (15 ) नायगांव येथील दवाखान्यात दाखवून अॅपे आॅटो क्रमांक एम.एच. 26 बि डी. 1160 या मध्ये बसून घुंगराळा ला जात होत्या, महामार्गावरील लोकमनवार पेट्रोल पंपा जवळ चालक सुनिल गजभारे यांनी एकदम ब्रेक लावल्याने ऑटो चक्क शेतात जाऊन पलटी झाला व या अपघातात इंदरबाई गणपत सुर्यवंशी यांना जबर मार लागला,त्यांना नायगांव च्या ग्रामीण रूग्णालयाला दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली.

या अपघातात कु दिपाली सुर्यवंशी व रुक्मिनबाई सुर्यवंशी या सुद्धा गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड ला हलवण्यात आले आहे. इदरबाई यांचा मृतदेह उतरीय तपासणी साठी नायगांव च्या ग्रामीण रूग्णालयाला ठेवण्यात आला आहे.

ऑटो मध्ये चालकासह पाच जण होते घटना समजताच घुंगराळयाचे सरपंच प्रतिनिधी मोहण जोगेवार, देविदास सुगावे, बबन जगताप संतोष पवार यांनी जखमीना दवाखान्यात नेण्यासाठी तात्काळ धाव घेऊन मदत केली. सुर्यवंशी परीवारावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हे वृत्त लिही पर्यंत कुंटुर पोलीसांचा पंचनामा करण्याचे काम चालु होते. अपघात झाल्यानंतर देगांव बिट चे जमादार मात्र नेहमी प्रमाणेच उशीरा दाखल झाले होते हे विशेष आहे .


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि