नांदेड हैद्राबाद शिवशाही बसला कामारेड्डी जवळ अपघात,नायगावचे सहा जण जखमी,एकाची प्रकृती चिंताजनक


नायगाव दि 14- नांदेड येथून हैदराबाद येथे जाणाऱ्या शिवशाही बसला कामारेड्डी जवळ पहाटे अपघात झाला असून अपघातात नायगाव हुन हैद्राबाद साठी निघालेल्या सहा जणांना जबर मार लागला आहे.त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे

नायगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी माधव कवटीकवार यांचे परवाच निधन झाले होते, वडिलांच्या अस्थी काशीला घेऊन निघालेले त्यांचे चिरंजीव शिवाजी माधव कवटीकवार 45, नातू,सचिन वसंत कवटीकवार 35 ,दोघे रा.नायगाव तर कवटीकवार परिवाराचे जावई चंद्रकांत रुद्रकंठवार रा.कलंबर 55 वर्ष हे हैद्राबाद हुन विमानाने काशी उत्तरप्रदेश येथे जात होते.तर दुसऱ्या एका कुटुंबातील काहीजण लग्न कार्यासाठी या बसने हैदराबादला जात होते.या अपघातात शेख अहेमद खाजा मिया वय 56 वर्ष यांचे माकड हाड मोडले.पत्नी हजरा बेगम शे. अहमद 50 वर्ष दोन्ही हात मोडले आणि डोके फुटले. मुलगी मिसबाह नुरी शे. अहमद 22 वर्ष यांनाही जबर मार लागला.सर्वजण नांदेडच्या डॉ. कतूरवार अर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

मध्य रात्री 12 वा नायगाव येथे येणारी ही शिवशाही बस एक तास उशिरा आली आली होती

विशेष म्हणजे नायगाव हुन निघाल्या नंतर नरसी चौकातून बोधन मार्गे जाणारी बस बेधुंद चालकाने नरसी देगलूर रस्त्यावरही नेली होती नंतर प्रवासी व वाहक यांनी आरडाओरड केल्या नंतर परतून घेऊन बोधन मार्गावर आणली.साखरझोपेची वेळ असल्याने सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना कामारेड्डी जवळ जागेवर दोन कोलांट ऊडया खात बस दरीत कोसळली

नायगाव येथील तरुण व्यापारी सचिन वसंत कवटीकवार याच्या डोक्याला जबर मार लागला असून 10 ते 15 टाके पडले आहेत.तर सराफी व्यापारी शिवाजी माधव कवटीकवार ,चंद्रकात रुद्रकंठवार हेसुध्दा जखमी झाले आहेत.

ड्रायव्हर ने मद्य प्राशन केले होते असे कंडक्टर चे म्हणणे आहे तसेच यात नायगाव येथील तीन जण गंभीर जखमी आहेत त्यांचे व इतर प्रवाशांचे अपघात झाल्यानंतर मोबाईल मौल्यवान वस्तू व पैसे गहाळ झाल्याची चर्चा आहे. या अपघातातील जखमी सुखरूपपणे घरी आले असल्याचे कळते---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि