हरबळ येथे 13 वर्षीय बालकाचा अपघाती मृत्यू,अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

सोनखेड दि 25 - सोनखेड पासून 2 किमी अंतरावरील हरबळ येथे दि 24 एप्रिल रोजी रात्री 8 च्या सुमारास हायवाचा पाठीमागून धक्का लागल्यामुळे एका 13 वर्षीय बालकाचा दुःखद मृत्यू झाल्याची दुःखद घटना काल रात्री 8 च्या सुमारास घडली

हरबळ येथील नागोराव गोविंदराव शिंदे यांचे गावात सध्या बांधकाम सुरू आहे,या बांधकामासाठी साहित्य घेऊन आलेल्या हायवा या वाहनाच्या मागील भागाचा धक्का गणेश तुकाराम शिंदे वय 13 या बालकाला लागला,

या धक्क्याने तो त्याच भागातील मोठ्या दगडावर जोराने पडला,यावेळी त्याच्या गुप्तांगाला तीव्र मार लागून तो जागीच गतप्राण झाला,आज दुपारी मयत बालकावर हरबळ येथे अत्यन्त शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले,या घटनेत कोणाची चूक,नुकसान भरपाई,गुन्हा अशा बाबी पुढे होतील किंवा होणार नाहीत,परंतु या दुर्दैवी घटनेत एका उमलत्या जीवनाचा दुःखद अंत झाला ही बाब परिसरातील संवेदनशील नागरिकांच्या जीवाला चटका लावणारी ठरली आहे, गणेश शिंदे या बालकाच्या अपघाती निधनामुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे


---माणिकराव मोरे,

पत्रकार, सोनखेड

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि