वजीरगावात वीज अंगावर पडून शेतकरी आनंद शंकर ढगे यांचा मृत्यू

नायगाव,दि 14- नायगाव तालुक्यातील वजीरगाव शिवारात हळद काढणी करत असताना गावातील शेतकरी आनंद शंकर ढगे  (वय ३५) याच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाल्याची दुर्घटना मंगळवारी (ता.१३) सायंकाळी घडली. 

        मागील आठवडय़ा भरा पासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई गडबडीने हळद काढणीला सुरुवात केली.मंगळवारी चार पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वारा पाऊस झाला होता. तालुक्यातील अनेक शेतकरी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत हळद काढणी शिजविण्यामध्ये व्यस्त होते. ढगाळ वातावरण असल्यामुळे काढलेली हळद जमा करण्यासाठी ढगे हे शेतात गेले असता वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.यावेळी अचानक वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधितांकडून रितसर पंचनामा करून मृतदेह नायगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला होता. आनंद ढगे यांच्या पार्थिवावर वजिरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई वडील,पत्नी मुलेमुली,भाऊ बहिण,असा परिवार आहे.त्यांच्या अशा अपघाती निधनामुळे तीव्र हळहळ व्यक्त होत आहे


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि