भारसावडा व चित्रावाडी भागात 21 तराफे जाळले,लाखोंचा मुद्देमाल जप्त,महसूल प्रशासनाची धडक मोहिम


सोनखेड दि 25- मागील चार महिन्यापासून लोहा तालुक्यातील गोदावरी पात्रात ठिकठिकाणी अवैधरित्या रेती उपसा व तस्करी सुरू आहे,याबाबत स्थानिक नागरिकांतून वेळोवेळी तक्रारी सुरू आहेत,दि 24 एप्रिल रोजी लोहा महसूल प्रशासनाने या बाबत धडक मोहीम राबवून रेती तस्करांवर मोठी कारवाई केल्याचे दिसून आले

लोहयाचे तहसीलदार विठ्ठलराव परळीकर यांनी दि 24 रोजी स्वतः एका मोटारबोटीने या भागातील नदीपात्रात फिरून पाहणी केली यावेळी त्यांना एकूण 21 तराफ्याच्या साहाय्याने या भागात अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याचे आढळून आले,तहसीलदारांनी तात्काळ याबाबत कडक पवित्रा घेऊन लगेचच ते तराफे जाळून नष्ट करण्याची कारवाई पार पाडली,याशिवाय या भागातून MH14 GU 1020 या हायवाचा वापर करून रेती तस्करी सुरू असल्याचे निदर्शनास आल्यावरून महसूल पथकाने 2 ब्रास रेतीसह हायवा ताब्यात घेतली व हायवा चालक,मालक गजानन कोंडीबा कऱ्हाळे,वय 28 रा. अंतेश्वर ता लोहा यांच्याविरोधात भा दं वि कलम 379,188,34, तसेच खाण व खनिजे अधिनियम च्या कलम 4 व 21 अन्वये गुन्हा दाखल केला यासोबतच संबंधिता विरुद्ध मा.जिल्हाधिकारी यांनी सध्या जिल्ह्यात लागू केलेल्या कोविड प्रतिबंधक नियमावलीचे उल्लंघन केल्याबद्दल ही गुन्हा दाखल झाला आहे,ही कारवाई करणाऱ्या महसूल पथकात

नायब तहसीलदार अशोक मोकळे

मंडळ अधिकारी डी एल कटारे,तलाठी जाधव,असकूलकर,निकम ,बोड्डावार,

सुंदरगीवार,शिंदे,एकाडे,कल्याणकर आदींचा समावेश होता,दरम्यान महसूल खात्याने या भागातील सक्रिय रेती तस्करांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी सर्व स्तरामधून होत आहे


---माणिकराव मोरे

पत्रकार, सोनखेड

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि