कहाळा - गडगा रस्त्यावर मांजरम शिवारात सलग दुसऱ्या दिवशी कारचा आपघात


*************************************************

मुखेडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकर बालंबाल बचावले

*************************************************

हनुमानाची मूर्ती भंग पावल्याने अपघातांची मालिका सुरू झाल्याचा काहीजणांची धारणा

*************************************************

नायगाव दि 01 - कहाळा गडगा रस्त्यावर परवाच ज्या ठिकाणी मांजरम शिवारात अपघात घडला त्याच अपघात प्रवण क्षेत्रात दि.30 एप्रिल शुक्रवार रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान कारचा अपघात झाला,यात केवळ सुदैवाने मुखेडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकर हे बालंबाल बचावले आहेत.

कहाळा गडगा रस्त्यावर मांजरम शिवराजवळच्या भागात सध्या अपघातांचे सत्र सुरू आहे,काल रात्री याच भागात सलगपणे 45 वा अपघात झाल्याची माहिती रस्त्या लगतच्या शेताचे मालक शहाजी जयराज शिंदे पो.पा.यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिलीआहे. परवा दि.29 एप्रिलला सकाळी १० च्या दरम्यान घडलेल्या अपघातामध्ये मांजरम जि.प.हा.चे साहित्यिक शिक्षक शेषेराव पवार सर यांचा दुर्दैवी अंत झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले ही घटना ताजी असतानाच लगेच दुसऱ्या दिवशी हा अपघात घडल्याने रस्त्याचा हा टप्पा अपघातप्रवण बनला असून तत्काळ या ठिकाणी आवश्यक फलक लावून वाहनधारकांना सतर्क करणे अत्यन्त गरजेचे असल्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरीत आहे

दि.30 एप्रिल रोजी मुखेडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकर हे मुखेड येथे आपले काम आटोपून नांदेडकडे जात होते, या भागात धोकादायक ठरत असलेल्या वळणावर त्यांच्या गाडीवरचा ताबा सुटला व त्यांची कार क्र.एम एच 26 ए के. 7199 पलटी खाऊन रस्त्याच्या खाली पडली , अपघात स्थळी मुखेड तालुक्यात अनेक शाळांना भेटी गाठी दिल्याचे अभिप्राय व माहिती संबंधित व त्यांचे नाव असलेली कागदपत्रे आढळल्यावरून नांदेड चे शीक्षण सभापती संजय अप्पा बेळगे व प्रा शिक्षण अधीकारी प्रशांत दिग्रसकर सर यांना मांजरमचे शेतकरी बाळासाहेब पांडे यांनी लगेच माहिती कळवली.स्वतः शेटकर हे सुरक्षित असून त्यांना मार लागला नसल्याचे दिग्रसकर साहेब यांनी पांडेंना फोन वरून सांगितले आहे. त्यानंतर शेटकर यांनीही फोनवरून आपण सुरक्षित असून सुदैवाने आपणास मार लागला नाही व केवळ दैव बलवत्तर म्हणून आपण बालंबाल बचवल्याचे पांडे यांना कळवले आहे

दुसऱ्या दिवशी सकाळी मांजरमचे पोलीस पाटील जयराज विश्वाभर पा. शिंदे यांनी घटना स्थळी जाऊन घटनेची सविस्तर माहिती नायगाव चे पोलिस निरीक्षक आर एस पडवळ यांना दिली . परंतु काही महाभागांनी संधी साधून रात्रीतून गाडीचे चार ही टायर व किमती सामान काढून नेल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.या नंतर नायगाव पोलिसांनी शेटकर यांच्या तक्रारी वरून अपघाताची नोंद व पंचनामा केला असून पुढील तपास मांजरम बिटचे जमादार वाघमारे हे करीत आहेत.याच अपघात प्रवण क्षेत्रात त्याच रात्री उशिरा काही मीटर अंतरावर एक जीपसुद्धा पलटी झाली आहे.त्या जागेवर एक वाळूची जुनी पावती व एक पुष्पहार ,पाण्याच्या बाटल्या व जीप चे तुटलेले सुटे भाग पडलेले आढळून आल्याचे काही प्रत्यक्ष दर्शीने सांगितले असून,या अपघाताचाही शोध घेण्याचे काम नायगाव पोलीस करीत आहेत.

*************************************************

हा 45 वा अपघात -शहाजी शिंदे

*************************************************

याच भागात इतक्यात सलगपणे झालेला हा 45 वा आपघात असल्याची माहिती रस्त्यालगतचे शेतकरी शाहजी शिंदे यांनी दिली असून सध्या सुरू असलेल्या अपघात मालिकेची नोंद परिसरातील शेतकरी करत आहेत व अपघातग्रस्त लोकांना मदतही करत आहेत असेही त्यांनी सांगितले. हा प्रकार माजी शिक्षण सभापती शिवराज पा.होटाळकर याना कळल्यानंतर त्यांनी तात्काळ के टी कन्स्ट्रक्शन चे अधिकारी शिंदे यांना कळवून त्या ठिकाणी बोर्ड तर लावाच पण अपघात होऊ नयेत यासाठी या भागात वाहनांचा वेग कमी करण्याच्या दृष्टीने व्यवस्था करा अशी सूचना दिली .या बाबत आमच्या प्रतिनिधीने शिंदे यांना संपर्क साधला असता बोर्ड लावण्याच्या कामाला सुरुवात झाली अशी माहिती कळाली,वरिष्ठ व सा.बा.विभाग अभियंता यांच्याशी चर्चा करून त्या भागात काय नियंत्रण व्यवस्था करता येईल याबाबत उपाययोजना केली जाईल असे त्यांनी सांगितले

*************************************************

अपघात प्रवण क्षेत्रातील हनुमान मूर्ती भंगल्यामुळे हा प्रकार- शेतकऱ्यांची धारणा

*************************************************

गडगा कहाळा रस्त्यावर मांजरम शिवारात या रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली काही दिवसांपूर्वी पर्यन्त एक हनुमान मूर्ती

होती,बाजूच्या शेतकऱ्याने धुरा जाळताना ते झाड जळाले व तेथे असलेले हनुमान मूर्ती भंगली त्या मुळेच असे अपघात होत आहेत अशी या भागातील काही शेतकऱ्यांची धारणा झाली आहे, या घटनेमुळेच असे अपघात होत असल्याचे ते ठामपणे सांगत आहेत. विज्ञान युगात ही बाब विश्वास ठेवण्याजोगी नसली तरी हनुमान मूर्ती खरोखरच भंगल्याचे दृश्य प्रत्यक्ष घटना स्थळावर गेल्यानंतर दिसून येते एवढे मात्र खरे आहे.

*************************************************


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि