कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव च्या नव्या गोदामाचे माजी आ.वसंत चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन संपन्न


नायगाव दि 25 - कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती नायगांव येथील मिर्ची मार्केट यार्ड लालवंडी रोड येथे राष्‍ट्रीय कृ‍षी विकास योजने अंतर्गत व महाराष्‍ट्र राज्‍य कृषी पणन मंडळ पूणे यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने १००० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. सदरील नव्या गोदामाचा उद्घाटन सोहळा माजी.आ.वसंतराव बळवंतराव पा.चव्‍हाण सभापती कृ.उ.बा.स.नायगांव यांच्‍या शुभ हस्‍ते पार पडला

या उद्घाटन सोहळ्यास कृ‍षी पणन मंडळाचे विभागीय अभियंता गणेश पाटील,व नायगांव तालूक्‍याच्या प्रभारी तहसिलदार मा.डॉ.सौ.मृणाल जाधव, नायगांवचे सहाय्यक निबंधक सुनिल गन्‍लेवार , विर्दभ को-ऑपचे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक वैभव ठाकरे , पणन अधिकारी पृथ्वीराज मानके, बाजार समितीचे उपसभापती मोहनराव पा.धुप्पेकर, पंचायत समितीचे उपसभापती तथा बाजार समितीचे संचालक संजय पाटील शेळगावकर, माधवराव आपा बेळगे,परसराम पा जाधव, संजय रेड्डी,आनंदराव पेन्टे,दत्ता पाटील, बालाजी पाटील ताटे,सतिष लोकमनवार,शेषेराव दासवाड यांची प्रमुख उपस्थिती होती, ह्या उद्घाटन सभारंभ प्र‍संगी केंद्र शासन आधारभूत किंमत योजने अंतर्गत नाफेड मार्फत द.विदर्भ को.ऑप मार्केटिंग फेडरेशन यांच्‍या वतीने सन २०२०-२१ ह्या हंगामाची तूर खरेदीचा शुभारंभही करण्यात आला.

तूरीची आधारभूत किंमत रु.6000/- असून ज्या शेतक-यांनी तूर खरेदीसाठी बाजार समितीकडे ऑनलाईन नोंदणी केली आहे.त्‍यांची तूर खरेदी होणार असून , बाजारात कमी किंमतीमध्‍ये तूर न विकता शेतक-यांनी शासनाच्‍या योजनेचा लाभ घ्‍यावा व तूर विक्रीसाठी बाजार समितीकडे नोंदणी करून तूर शासनास विकून शेतक-यांनी योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती यांनी यावेळी केले . कार्यक्रमात

हरी पाटील यशवंतराव कुराडे, नागोराव कुराडे ,भगवानराव पाटील मुगावकर तसेच, बाजार समितीच्‍या कार्यक्षेत्रातील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायतीचे सरपंच, नायगांव नगरीतील प्रतिष्ठित नागरीक , व्‍यापारी,हमाल मापाडी , पत्रकार एस एम मुदखेडकर, सुर्यकांत सोनखेडकर यांचीही उपस्थिती होती तसेच बाजार समितीचे प्रमुख सचिव एस व्ही कदम एम एस कदम, माधव कुलकर्णी, ढगे काळेश्वर ,बोमनाळे,रामदास गायकवाड, सुभाष शिंदे शंकर पापडू नरतावार आदीनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि