नायगाव आणि धर्माबाद पोलीसांच्या सतर्कतेमुळे आज एक बालविवाह रोखला


नायगाव दि 30 - नायगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह धर्माबाद तालुक्यात होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे गेली. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत तातडीने पावले उचलली आणि नायगाव पोलिसांना सदर माहिती दिली. नायगाव पोलिसांनी धर्माबाद पोलीसांना कळवले व या दोन पोलीस ठाण्याच्या समन्वयाने आज ता. ३० रोजी होणारा बालविवाह अखेर रद्दबातल झाला आहे.

विविध व्यासपीठावरून शासनासह खाजगी लोकसेवी संस्थांच्या माध्यमातून बालविवाह पार पाडू नयेत यासाठी अखंड लोकजागर सुरू आहे,परंतु ग्रामीण भागात मात्र अजूनही जुनाट रूढी परंपरांचे अनुसरण केले जात आहे, विशेष करून संपूर्ण मुलींचे हित व आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी असे बालविवाह प्रतिबंधक प्रयत्न सुरू आहेत, कायद्याचा धाक दाखवूनही ग्रामिनांवर अजूनही म्हणावा तसा फरक पडत नाही हे आजच्या घटनेवरून दिसून आले

या बाबत अधिक माहिती अशी की नायगाव तालुक्यातील मरवाळी येथील भास्कर पवळे यांच्या मुलीचा विवाह धर्माबाद तालुक्यातील सालेगाव येथील रावसाहेब मारोती गाडे यांच्याशी आज ता. ३० रोजी होणार होता. पण सदरची मुलगी ही अल्पवयीन असल्याची तक्रार थेट जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडे काल ता. २९ रोजी गेली. जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणी तातडीने दखल घेत सदरची माहिती नायगाव पोलिसांना सांगितली. ही माहिती मिळताच नायगावचे पोलीस निरीक्षक आर.एस.पडवळ यांनी पोलीस जमादार शेख यांना तातडीने मरवाळी येथे पाठवून भास्कर पवळे यास ताब्यात घेतले. यावेळी पवळे यांनी हा विवाह होणार नसल्याचे लेखी जबाब दिला.

यानंतर नायगाव पोलिसांनी धर्माबाद पोलीसांना ही माहिती कळवली त्यामुळे धर्माबाद पोलीसांनाही तत्काळ सालेगाव येथे जावून मुलाला व त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी ही विवाह करणार नसल्याचा लेखी जबाब पोलीसांना दिला. आणि सदरचे प्रकरण बालहक्क संरक्षण समितीकडे वर्ग करण्यात आले. या समितीने ता. ३० रोजी मरवाळी येथे भेट दिली व वधू पित्याच्या घरी जावून विवाह थांबवण्यात आलेल्या मुलीच्या वयाचे पुरावे घेवून गेले असल्याची माहिती मिळाली.

जिल्हाधिकारी कार्यालयाची सतर्कता आणि धर्माबाद व नायगाव पोलीसांच्या जागरुकतेमुळे एका अल्पवयीन मुलीचा विवाह टळला. याबद्दल दोन्ही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि