नांदेडच्या ओंकारेश्वर नगरात महंत प्रभाकरबुवा कपाटे यांच्या संगीतमय भागवत कथा सोहळ्याचे आयोजन


नांदेड दि 08 - भोकर येथील महानुभाव पंथाचे सुप्रसिद्ध भागवत कथाकार महंत श्री प्रभाकर बुवा कपाटे यांच्या रसाळ वाणीतील भागवत कथेचे आयोजन नांदेडच्या चैतन्यनगराजवळील ओंकारेश्वर नगरातील श्री जागृत हनुमान मंदिर परिसरात दि 12 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे,भाविकांनी या संगीतमय भागवत कथेचे आवर्जून श्रवणसुख घ्यावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे,

सुमधुर संगीताद्वारे अलंकारित असलेली व श्रोत्यांना तल्लीन करणारी भागवत कथा सांगण्यात श्री प्रभाकर बुवा कपाटे यांचे कौशल्य सर्वश्रुत असून नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या या भागवत सप्ताहात दु 1 ते 4 या कालावधीत कथा श्रवणाची मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे,या संगीतमय कथा सोहळ्यात अमरावती येथील सुप्रसिद्ध गायिका सौ वनिता कोहळे,बासरीवादक राठोड,नागपूरचे ऑर्गन वादक व गायक महात्मा योगेश तसेच अमरावती व चंद्रपूर येथील निष्णात तबला वादकांची साथ या कथा सोहळ्यात लाभणार आहे.नांदेड द. चे आ.बालाजीराव कल्याणकर यांच्या शुभ हस्ते या कथा सोहळ्याचा शुभारंभ होणार असून या कथायज्ञात हिंगोलीचे खा हेमंत भाऊ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर दिग्गज हजेरी लावणार आहेत,युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बळवन्त तेलंग यांनी या कार्यक्रमाचा भाविकांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे


--- श्रीकांत देव

मुख्य संपादक नांदेडवैभव

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि