स्वावलंबी शेतकरी,संपन्न ग्राम,समर्थ भारत"या उद्दिष्टांसाठी भारतीय किसान संघ नांदेड ची नरसी येथे बैठक


नायगाव दि 11- स्वावलंबी शेतकरी,संपन्न ग्राम,समर्थ भारत"या उद्दिष्टांसाठी तळमळीने झटणाऱ्या भारतीय किसान संघाची नरसी येथे बैठक संपन्न झाली, नरसी येथील बालाजी मंदिरात संपन्न झालेल्या या बैठकीत किसान संघाचे प्रदेश मंत्री दादा लाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

लॉक डाऊन नंतर प्रथमच नांदेड जिल्ह्यांत भारतीय किसान संघाची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली,किसान संघाची कार्यपद्धती, संघटन,किसान आंदोलन व सदस्य नोंदणी आदी विषयावर मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन झाले. मा दादा लाड प्रदेश संघटन मंत्री महाराष्ट्र व गोवा , प्रा डॉ व्यंकटराव माने सर प्रांत कार्यकारणी सदस्य ,रमेश कुंभारे जिल्हा अध्यक्ष नांदेड, आदी मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले,

नांदेड जिल्ह्यात भारतीय किसान संघ सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत असून शेतकरी बांधवांचा या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे,यावेळी बोलताना दादा लाड यांनी भारतीय किसान संघाच्या शेतकऱ्यांचा,शेतकऱ्यांमुळे गावाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा खरा विकास व्हावा, शेतकरी पूर्णपणे स्वावलंबी व्हावा,त्याचे परावलंबीत्व नष्ट व्हावे,लाखो करोडोंच्या या पोशिंद्याला समर्थपणे जगता यावे अशा अत्यंत प्रामाणिक उद्दिष्टासाठी किसन संघ देशभरात कार्यरत आहे असे सांगितले व सदस्य नोंदणीला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले,

या बैठकीत नांदेड जिल्ह्याच्या 7 तालुक्यातील 51 गावातून 153 प्रतिनिधी उपस्थित होते, तसेच संघाच्या भोकर ,धर्माबाद बिलोली, ह्या तालुक्यातील तालुका कार्यकारणीनेही बैठकीत पूर्ण सहभाग नोंदवला, साईनाथ कोदळे ता मंत्री धर्माबाद ,पांडुरंग बुद्देवार ता मंत्री बिलोली, गंगाधर अकमवाड ता मंत्री देगलूर तसेच जिल्हा अध्यक्ष रमेश कुंभारे , विजय मोरगुलवार जिल्हा मंत्री, दत्तपुरी अनंतपुरी महाराज चोळाखेकर, जिल्हा पालक नरेंद्र जोशी गुरुजी, जिल्हा सहमंत्री नारायण सादुलवार यांच्यासह अनेक कार्यकारिणी सदस्यांनी सहभाग घेतला.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि