नायगाव कोवीड सेंटरवर अजय बाहेती यांच्याकडून 150 बिस्कीट बॉक्सचे वाटप; डॉक्टर, रुग्णाकडून आभार


नायगाव दि 07- नायगाव तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील सुप्रसिद्ध इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनी एम आय डी सी कृष्णूर या कंपनीचे चेअरमन अजय बाहेती यांच्या कडून नायगावच्या कोविड सेंटर येथे उपचार घेत असलेल्या रुग्णासाठी वतीने दिडशे एव्हरप्रेश बिस्कीटचे बॉक्स मंगळवारी वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे कोरोनाग्रस्त पालक,बालक व रुग्ण व डॉक्टर यांनी स्वागत व आभार व्यक्त केले आहे.

नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील कंपनीचे मालक अजय बाहेती यांच्या कडे तालुक्यातील जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे हे हळद विक्रीच्या सौद्या च्या निमित्ताने गेले असता बाहेती यांच्या समाजसेवी वृत्तीची जाणीव ठेवून कोवीड सेंटर साठी काही तरी करावे असा प्रस्ताव पांडे यांनी ठेवला. बाहेती यांनी तात्काळ मान्यता दिल्या नंतर कोविड सेंटर प्रमुख डॉ देवणीकर साहेब यांच्याशी संपर्क साधला , व कोरोना ग्रस्त रुग्णासाठी पोषक आहार पुरवण्याच्या हेतूने एकूण १५० बिस्कीटचे बॉक्स वाटप करण्यात आले.रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांना पाच दिवसापर्यंत पुरतील एव्हढ्या बिस्कीट डब्याचे वाटप केल्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांणी यांनी समाधान व्यक्त केले आहे,कोविड ग्रस्तांसाठी बाहेती यांनी दाखवलेल्या सद्भावनेबद्दल रुग्णांनी मनःपूर्वक आभार मानल्याचे यावेळी दिसून आले

कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ हनुमंतराव गुंटूरकर, डॉ नरेशराव देवणीकर, डॉ .अविनाशराव पांढरे कौठाळकर , यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून,डाँ पांढरे,डॉ वाघमारे,डॉ बिडवई,डॉ ताटे,डॉ गजले,डॉ त्रिपती बिराजदार,डॉ धनश्री शिंदे,डॉ अंजेली खंडगावकर,डॉ वर्षा नारे,डॉ गजानन बोधने,डॉ शिल्ला पेंटे,डॉ नर्स रेखा खेटाळे, करुणा मोदलवाड, महानंदा कोंके, करुणा आडपलवाड, पूजा सूर्यकार, आदींची यावेळी उपस्थित होती.

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि