भाजप संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सज्ज व्हावे- श्रावण पा.भिलवंडे


नायगाव दि 26- आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत कशी होईल याकडे लक्ष केंद्रित करावे, एक व्यक्ती एक पद असे पक्षाचे धोरण असून बुथ अध्यक्ष हे पद पक्ष वाढीसाठी खऱ्या अर्थाने मोठे पद आहे. पक्ष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भाजप चे संघटन अधिक बळकट करण्यासाठी सज्ज व्हावे .या मध्ये हयगय केल्यास येणाऱ्या कुठल्याही निवडणूकीत उमेदवारी मिळणार नाही याची नोंद घ्यावी असे प्रतिपादन नरसी येथील तालुकानिहाय बूथ कमिटीच्या बैठकीत भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी उपसभापती श्रावण पा.मिलवंडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.

25 फेब्रुवारी रोजी नरसी येथे श्रावण पाटील यांच्या संपर्क कार्यालयात बुध कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा व भाजप कार्यकर्त्याचा मेळावा घेण्यात आला.या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे होते.

याप्रसंगी बालाजी बच्चेवार, नायगावचे सभापती प्रतिनिधी विट्ठलराव कात्ते, तालुकाध्यक्ष कोंडीबा शिंदे,लक्ष्मण ठक्करवाड

धनराज शिरोळे, देविदास बोमनाळे, परमेश्वर धानोरकर, नामदेव कांबळे, गजानन चव्हाण, जीवन चव्हाण, माधव कंयारे,अवकाश धुप्पेकर,भगवान लंगडापूरे, गोविंदराव कुंटूरकर, वैजनाथ ढगे,सचिन बेंद्रीकर, शिवा गडगेकर, वसंत कस्तुरे, गजानन मिलवंडे, डिंगबार मिलवंडे, सय्यद खालील, अनिल पवळे, उपसरपंच आलीम पटेल, फारूख पटेल, शेख मुखींद आदीची उपस्थिती होती.

पदाधिकाऱ्यांनी गटातटाचे राजकारण व मतभेद बाजूला सारून कोणत्या नेत्याचे कोण कार्यकर्ते आहेत याकडे अधिकचं लक्ष न देता मूळ पक्षवाढी कडे लक्ष दयावे,नायगावच्या तालुकाध्यक्ष यांनी भाजपाची तालुकानिहाय कार्यकारणी जाहीर करावी. तसेच येणाऱ्या नगरपंचायत असो अथवा जिल्हा परिषद व पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी सज्ज राहून तालुक्यातील १७० बुथ प्रमुख आणि ३६ शक्ती प्रमुखांची तातडीने निवड केली जावी असे मत बालाजी बच्चेवार यांनी यावेळी व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोप करताना शिवराज पाटील म्हणाले.गेल्या पंचवीस वर्षांपासून श्रावण मिलवंडे, अन् बालाजी बच्चेवार यांनी संघर्षातून या भागात भाजप संघटना वाढवली सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे अनुकरण करून भाजप अधिक बळकट कसा होईल याबाबत आपले योगदान द्यावे असे आवाहन केले


*************************************************

बूथ कमिटीच्या बैठकीत भाजप लोकप्रतिनिधी व पदाधिकारी अनुपस्थित


नायगाव ता भाजप बूथ कमिटी बैठकीत भाजप आमदार,जि.प.सदस्य, तालुक्यातील काही व शहर पदाधिकारी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनला. अनेक कार्यकर्त्यांत हीच चर्चा सुरू होती ,काही जण तर शहरात असूनही बैठकीत हजर न राहिल्याने यानिमित्ताने सुरू असलेला पक्षांतर्गत वाद ठळकपणे सर्वांच्या लक्षात आला.

*************************************************


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि