उमेदवाराच्या नावा पुढे चिन्हच नव्हते, खैरगाव येथील एका मतदान केंद्रावर दि 17 रोजी पुन्हा मतदान

नायगाव दि 16- निवडणुकीत नामांकन दाखल करतांना उमेदवाराकडून काही चूक भूल झाल्यास ती त्याच्यासाठी पुढील काळात टांगती तलवार ठरते,परंतु निवडणूक घेणाऱ्या शासकीय यंत्रणेनेच निवडणूक प्रक्रियेत घोडचूक केल्यास उमेदवारांसाठी,मतदारांसाठी, व संबंधित कर्मचाऱ्यांसाठी केवळ ऍक्शन रिप्लेचा खेळ ठरतो याचे उदाहरण नायगाव तालुक्यातील खैरगाव येथील वार्ड क्र तीन च्या निवडणुकीत दिसून आले,

नायगाव तालुक्यातील खैरगाव येथील वार्ड क्र तीन मधील सर्वसाधारण महिला या जागेवरील अपक्ष उमेदवार ललिता शंकर घटेवाड यांचे नावा पुढिल चिन्हच मतदान यंत्रावर उपलब्ध ठेवण्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांना विसर पडल्यामुळे या मतदान केंद्रावर पुन्हा दिनांक 17 जानेवारी रोजी मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक प्रशासनाने घेतल्याचे नायगाव येथील तहसीलदार गजानन शिंदे यांनी बोलताना सांगितले.

या बाबत अधिक वृत्त असे की नायगाव तालुक्यात 15 जानेवारी रोजी 63 ग्राम पंचायतच्या निवडणुकी बरोबर खैरगाव येथे निवडणूक पार पडली होती या निवडणुकीत या मतदान केंद्रावर एकूण 458 पैकी 355 मतदारानी मतदानाचा हक्क बजावला होता.या ठिकाणी सत्ताधारी व विरोधी गट यांच्यात दुरंगी सामना झाला.वार्ड क्र 3 मध्ये अपक्ष उमेदवार ललिता शँकर घटेवाड यांनी रीतसर उमेदवारी अर्ज भरला होता.पण

मतदान यंत्रात मतपत्रिका सेट करताना निवडणूक निर्णय अधिकारी बासरकर यांच्या नजर चुकीने घटेवाड यांचे नावा समोर चिन्हच विसरले ,ही चूक लक्षात आल्यानंतर परत मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे, मतदान केंद्रावर केंद्र प्रमुख व सर्व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी घेतली आहे.आवश्यक त्या सूचना गजानन शिंदे तहसीलदार नायगाव याना देण्यात आल्याचे कळाले,


नजर चुकीने झालेली चूक कुमुद पटेल


खैरगाव येथील वार्ड क्र.3 च्या मतपत्रिकेत अपक्ष उमेदवार यांचे नाव विसरले होते हे खरे आहे. ही चूक जरी प्रशासनाची असली तरी निव्वळ नजर चुकीने हा प्रकार घडला आहे, पुनर्निवडणुकी साठी आम्ही गावकरी प्रशासनाला सहकार्य करायला तयार व सज्ज आहोत अशी माहिती माजी उपसरपंच व पॅनल प्रमुख कुमुद पटेल यांनी दिली.

उमेदवार प्रतिनिधी शँकर घटेवाड यांनी सदर चूक नजर चुकीने झाल्याचे मान्य केले असून आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेला सहकार्य करणार असल्याचे सांगितले


---बाळासाहेब पांडे


Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि