आता नांदेड जिल्ह्यातही सात ते अकरा अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

 नांदेड,दि. 20 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भावा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदेड जिल्ह्यात दिनांक 14 एप्रिल, 2021 रोजी अत्यावश्यक सेवेबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या होत्या. या आदेशात पूर्वी दिलेला सकाळी 8  ते 1 या वेळेत बदल करण्यात आला असून हा कालावधी आता कमी केला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून आता मंगळवार दिनांक 20 एप्रिल 2021 पासून प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, सर्व खाद्य पदार्थाचे प्रकार  (चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडी इ.) कृषी विषयक संबंधित दुकाने, कृषी अवजारे आणि शेतातील उत्पादन, पाळीव प्राण्यांच्य अन्न पदार्थाची दुकाने, पावसाळयाच्या हंगामाशी निगडीत व्यक्तींसाठी तसेच संस्थासाठी देखील साहित्य मिळणारी दुकाने या आस्थापना सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहतील. या दुकानातून घरपोच सेवा ही सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत चालू राहील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक आदेशात सांगितले आहे. सदर आदेशाची अंमलबजावनी 20 एप्रिल 2021 चे रात्री 8 वाजेपासून ते दिनांक 1 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यत लागू राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील.


---श्रीकांत देव,

मुख्य संपादक,नांदेडवैभव

 

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि