छ.संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नायगाव शहरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन


नायगाव दि 13 - रणझुंजार अतिवीर, महाराष्ट्राच्या जनमानसातील वंदनीय युवराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त नायगाव शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दि.१४ मे रोजी सकाळी १० वाजता भारत जिनिंग समोर डी.बी .पाटील कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे. या भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या शुभ हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाद्वारे संपन्न होणार आज, उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे राहणार आहेत. राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर अलोट प्रेम करणारे मावळे या शिबिरात मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.

कोविड संकट काळात रुग्णांना रक्ताची प्रचंड कमतरता भासत असल्याचे ओळखुन राजे संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सामाजिक गरजेच्या जाणिवेतून हा उपक्रम नायगाव तालुक्याच्या वतीने राबविण्यात येत आहे .नायगाव शहर व तालुक्यातील रक्तदात्यानी सामाजिक बांधिलकी म्हणून या जनसेवेच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक शिवराज पाटील होटाळकर मित्र मंडळ , शिवनंदन ग्रुप चे अध्यक्ष मंगेश पा.पवार व राजे संभाजी जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


---बाळासाहेब पांडे, मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि