जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांची धडक कारवाई,पेनूर व भारसावडा येथील 72 ब्रास रेतीचा लिलाव


सोनखेड दि 23- नदी पात्रातील रेतीचा अहोरात्र अवैध उपसा चालवणाऱ्या रेती माफियाना स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनीच लोहा तालुक्यातील पेनूर व भारसावडा येथे अचानक धाड टाकून धडा शिकवल्याची घटना घडली असून या वेळी सापडलेल्या 72 ब्रास अवैध रेती साठ्याचा लिलाव करून 331200 रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला

मागील जवळपास एक महिन्याच्या कालावधीपासून स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनीच जातीने लक्ष घालून या भागातील रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम चालवली आहे,परंतु राजकीय पाठिंब्याच्या जोरावर मस्तावलेले रेती माफिया या अवैध धंद्यातून सुरू असलेल्या मोठ्या कमाई मुळे शासकीय कारवायांना दाद देत नसल्याचे चित्र आहे,स्थानिक कर्मचाऱ्यांना अरेरावीची वागणूक देण्यापर्यंत या तस्करांची मजल पोचली आहे.दि 22 फेब्रुवारी रोजी रात्री आठ च्या सुमारास स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनीच लोहा तालुक्यातील पेनूर व भारसावडा येथे धाड टाकून एकूण 72 ब्रास रेती साठा ताब्यात घेतला,4600 रुपये प्रति ब्रास या शासकीय दराने या रेतीची लिलावाद्वारे विक्री करून 331200 रुपये शासकीय तिजोरीत जमा करण्यात आले,सकाळी सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती,

सध्याच्या कोविड पार्श्वभूमीवर महसूल,पोलीस प्रशासन शासकीय निर्देशानुसार दिवसभर कोविड प्रतिबंधक त्रिसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात व्यस्त आहे,याचा अचूक फायदा घेत असलेल्या रेती तस्करांना स्वतः जिल्हाधिकारी व महसूल,पोलीस प्रशासनाने रात्रीचा दिवस करून या घटनेत जबरदस्त कारवाई केल्यामुळे रेती तस्करात जरब निर्माण झाली आहे,प्रशासनाच्या या धडक कारवाईचे जनतेतून जोरदार स्वागत होत आहे

उपविभागीय अधिकारी राम बोरगावकर,नायब तहसीलदार अशोक मोकले,मंडळ अधिकारी डी एल कटारे,तलाठी मारोती कदम,परशुराम जाधव,संतोष असकुलकर,कांबळे आदी महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांसह एपीआय महादेव मांजरमकर,पीएसआय चंदनसिंह परिहार व पोलीस कर्मचाऱ्यांनी या यशस्वी कारवाईत सहभाग घेतला


---माणिकराव मोरे,

पत्रकार, सोनखेड

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि