जिल्हाधिकाऱ्यांची अचानक नायगावला भेट ,कोरोना प्रतिबंधक पथकाच्या कामगिरी बाबत व्यक्त केले समाधान


नायगाव दि 19- जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर हे आज दि १९ मार्च रोजी सकाळी ११-०० वाजता देगलूर कडे जात असताना अचानक नायगाव येथे थांबले,येथील वर्दळीच्या डॉ. हेडगेवार चौकात त्यांनी आपले वाहन थांबवून कोरोना प्रतिबंधक उपाय योजना बाबत स्थानिक नागरिकांशी विचारपूस केली. नागरिकांनी त्यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरावरून त्यांनी कोरोना प्रतिबंधक पथकाच्या कामगिरी बाबत समाधान व्यक्त केले

नायगाव येथे कोरोना प्रतिबंधा बाबत सुरू असलेल्या उपाय योजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी स्वतः नायगावातील काही व्यापारी प्रतिष्ठाणें व उपहार गृहाना भेट देऊन पाहणी केली,सध्या वाढती कोरोनारुग्ण संख्या लक्षात घेता नायगाव शहरात प्रतिबंधात्मक उपाय योजनांची कडक अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विनामास्क रस्त्यावर फिरणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करीत बेजबाबदार पणे फिरणाऱ्या लोकांकडून एकूण 14 हजार 900 रु दंड वसूल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील उपहारगृहे, मंगल कार्यालये,कोचिंग क्लासेस, सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे बंद करण्यात आले आहे. यापूर्वी महसूल, नगर पंचायत, पोलीस यांनी संयुक्त पणे शहरातील विविध चौकात आणि शहरातील वर्दळीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीनां व वाहनधारकाना दंड आकारून ,कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधक उपाय योजना प्रभावीपणे राबवून जनतेत जागृती केली आहे. त्यामुळे आज दि१९ मार्च रोजी विनामास्क,व उपहारगृह चालकांकडून कोरोना महामारीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याने १४९००रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.अशी माहिती नायगाव नगर पंचायत चे प्रभारी मुख्याधिकारी नंदकुमार भोसीकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शहरातील सर्व नागरिकांनी तोंडाला मास्क घालूनच घरा बाहेर पडलेले पाहून समाधान व्यक्त केले आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, तहसीलदार गजानन शिंदे, पोलीस निरीक्षक रमाकांत पडवळ , प्रशासक तथा मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर , रामेश्वर बापुलें सह नगर पंचायतीचे कोरोना प्रतिबंधक पथकातील कर्मचारी उपस्थित होते.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि