मरवाळी येथे तत्काळ संगणक परिचालक उपलब्ध करून देण्याची ग्रामसेवकाची मागणी

नायगाव प्रतिनिधी दि 25- ग्रामपंचायत कार्यालय मरवाळी येथे तात्काळ संगणक परिचालक उपलब्ध करून देण्याची मागणी.गटविकास अधिकारी,पंचायत समिती नायगाव ता.नायगाव जि.नांदेड यांच्या कडे ग्रामसेवक एच डी कुलकर्णी यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामपंचायत कार्यालय मरवाळी येथील संगणक परीचालक रामेश्वर दिगबर वजिरगावे गेल्या काही दिवसांपासून अनुपस्थित असून त्यामुळे ग्रा.पं. चे कामकाज खोळंबले आहे. संगणक परीचालक याला भ्रमण-ध्वनीवर संपर्क साधला असता त्याने सांगितले की, माझ्या डोळ्याला मार लागल्यामुळे मला स्क्रीनवर पाहण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे,तसेच दिनांक 18/2 /2021 ते 18/3/2021 पर्यंत रजा मागणी अर्ज ग्रामसेवक मरवाळी यांच्या व्हाट्सएप वर पाठवला आहे.

सध्या इग्राम सॉफ्ट या संगणकीय प्रणालीत नमुना नं.8 अपलोड करणे व परिसॉफ्ट या आज्ञावलीत ग्रा.पं.चे योजनानिहाय कीर्ड अपलोड करण्याचे काम विहीत कालमर्यादेत व तातडीने करणे आवश्यक आहे,

पण संगणक परीचालक याच्या सातत्यपूर्ण अनुपस्थितीमुळे ग्रा.पं. कडे रेकॉर्ड उपलब्ध असूनही ते ऑनलाईन करता येत नाही तसेच आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नागरिकांना आवश्यक सेवा पुरवता येत नाहीत.आपले सरकार सेवा केंद्राच्या सेवा सद्यस्थितीत बंद आहेत.गावातील नागरीकांकडून याबाबत सातत्याने विचारणा होत आहे.त्यामुळे कृपया ग्रा.पं. मरवाळी यांना तात्काळ नवीन संगणक परीचालक उपलब्ध करून देण्यात यावा,जेणेकरून ग्रा.पं. ची संगणकीय प्रणालीवर करावयाची कामे विहीत कालावधीत पूर्ण होऊ शकतील.या साठी त्वरित संगणक परिचालक देऊन उपकृत करावे अशी मागणी कुलकर्णी यांनी निवेदनातून केली आहे.

कुलकर्णी यांच्या शी संपर्क साधला असता वॉट्सप रजा पाठवून देऊन संगणक परिचालक रजेवर गेल्याने अनंत आडचणी निर्माण होत असून त्वरित व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


---बाळासाहेब पांडे, मांजरमकर


(कृपया आमच्या न्यूज ब्लॉग ला सबस्क्राईब करून सहकार्य करावे)

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि