नायगाव पंचायत समिती समोर संगणक परिचालकांचे निषेध आंदोलन


नायगांव दि 25- महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ जानेवारी २०२१ रोजी संगणक परिचालक यांच्यावर अन्याय करणारा शासन निर्णय जारी केला आहे, "आपले सरकार" प्रकल्पात ३९२ कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या CSC-SPV कंपनीला पुन्हा काम दिले या अन्यायाच्या निषेधार्थ नायगांव तालुका संगणक परीचालक संघटनेच्या वतीने येथील पंचायत समिती कार्यालयासमोर दिनांक २५ रोजी काळ्या फीती लावून निषेध आंदोलन करण्यात आले,यावेळी गटविकास अधिका-यांना संघटनेने आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे .

मागील अनेक वर्षापासून गावातील ग्रामपंचायत स्तरावर महत्वाची भुमिका बजावणा-या संगणकपरीचालकांच्या उपजीविकेचा प्रश्न शासनाने अडगळीत टाकला आहे,उलट भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला मात्र पाठीशी घालण्याचे काम शासन करत आहे,या अन्यायकारक धोरणाच्या त्याच्या निषेधार्थ आज जोरदार घोषणाबाजी करीत संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे .

१४ जानेवारी २०२१ चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करा , सर्व संगणक परिचालक यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्या , आपले सरकार प्रकल्पात ३९२ कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या CSC-SPV कंपनीवर कारवाई करा आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले .

यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष शेषेराव बेलकर , दिपक बच्छाव , रामेश्वर पवार , पांडुरंग बनसोडे , गंगाधर गंगासागरे , संभाजी पांचाळ , रामकृष्ण मोरे , गजानन कदम , रामेश्वर वजीरगावे , बालाजी मेहत्रे , बाजीराव ढगे , गजानन हेंडगे , शैलेश जाधव , शेख मोलासाब , खुशाल शिंपाळे , तिरुपती जाधव , सपना हंबर्डे , सविता मोरे , गंगासागर सज्जन , मिनाताई संगेपवाड यांसह अनेक संगणक परीचालक उपस्थीत होते .


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि