प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर 79 वर्षाच्या श्रीमती देशपांडे व सौ शिंदे यांनी कोरोनावर मात केली


नायगाव ,दि 26 - सध्या सर्वत्र सुरू असलेल्या कोरोना थैमानामुळे भीतीचे वातावरण पसरत आहे,प्रामुख्याने वृद्ध व्यक्तींना या आजाराची जास्त दहशत वाटत असल्याचे दिसत आहे, परन्तु नायगाव तालुक्यातील दोन खंबीर महिलांनी मात्र तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर या महामारीवर यशस्वीपणे मात केल्याची सुवार्ता आहे

नायगाव तालुक्यातील मुगाव येथील श्रीमती सुमनबाई कोंडोपंत देशपांडे वय 79 वर्ष,तर मांजरम ता नायगाव येथील मैनाबाई दिगंबर शिंदे वय 79 वर्ष या दोन ज्येष्ठ व खंबीर महिलांनी रोगप्रतिकार शक्ती व इच्छाशक्तीच्या बळावर कोरोना महामारीचा पराभव केल्याची सुखद वार्ता आहे, या दोन्ही महिला दवाखान्यात उपचार घेऊन खडखडीत बऱ्या होऊन घरी आल्या आहेत. त्यांच्या सुखरूप घरी परतण्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे दिसून आले.

कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, त्या सिटीस्कॅन स्कोअर देखील थोडा जास्तच आढळल्यामुळे त्यांना यापूर्वी उपचार घेण्या साठी रुग्णालयात दाखल केले होते.श्रीमती सुमनबाई कोंडोपंत देशपांडे यांनी श्री गुरुजी हॉस्पिटल छत्रपती चौक नांदेड येथे उपचार घेतले होते, तिथले डॉ.तोष्णीवाल,डॉ .बर्गे,डॉ. बजाज, यांच्यासह सुरेश शिंदे मांजरमकर आदींनी त्यांची योग्य तऱ्हेने काळजी घेतली ,रुग्णाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी परीश्रम घेतले व श्रीमती देशपांडे यांनी उपचाराला प्रतिसाद देत कोविड वर यशस्वी मात केली,तर दुसऱ्या ज्येष्ठ महिला मांजरम ता.नायगाव येथीलमाजी सरपंच भाई दिगबर शिंदे यांच्या पत्नी सौ.मैनाबाई दिंगबर शिंदे यांच्या वयाचा विचार करून खाजगी दवाखान्यात त्यांना चक्क प्रवेश नाकारल्या गेला होता,त्यानंतर त्यांना कुटुंबीयांनी त्यांना आयुर्वेदिक दवाखान्यात दाखल केले,त्यांनीही खंबीरपणे तिथल्या उपचार यंत्रणेला प्रतिसाद देत कोविड वर विजय मिळवला,आता त्यासुद्धा पूर्णपणे तंदुरुस्त होऊन घरी आल्या आहेत.

मागील वर्षी रुग्णांना फक्त कोरोनाची भीती सतावत होती परंतु यावर्षी सिटीस्कॅन स्कोअरचा रिपोर्ट सामान्य नागरिकांना हैराण करणारा ठरत असल्याचे दिसून येत आहे,त्यामुळे भीतीतही जादा भर पडत असल्याची परिस्थिती आहे,प्लेटलेट कमी होणे, बी पी, शुगर,हृदयविकार,डेंग्यू सह दम्याच्या आजाराने त्रस्त रुग्णांना कोरोनाची जास्तच धास्ती वाटत असल्याचे दिसत आहे,

सिटी स्कॅन रिपोर्टमध्ये जास्त स्कोअर आला की तात्काळ हैद्राबाद, औरंगाबाद किंवा मुंबईत घेऊन जा असा सल्ला डॉक्टर देत असल्यामुळे जनता व सामान्य नागरिक यावर्षी चांगलेच वैतागले आहेत,विशेष म्हणजे वैद्यकीय सल्ल्यानुसार धावपळ,खर्च करून मोठे शहर गाठूनही बऱ्याच जणांच्या पदरी घोर निराशा पडत असल्याचे अतिशय वाईट चित्र यावर्षी अत्यन्त नाईलाजाने अनुभवावे लागत आहेत .

कोरोनाविषयी बहुतेक लोकांच्या मनात मोठे संभ्रम कायम आहेत, संबंधित रुग्णालयांनी पेशंटचा मृत्यु कशामुळे झाला ही देतांना पारदर्शिता जपणे अत्यावश्यक असल्याची अनेकांची तक्रार आहे,याशिवाय प्रत्येक रुग्णांच्या सीटी स्कॅन स्कोअरच्या रिपोर्टचीही फेरचाचणी करणे अवघड असली तर प्रशासनाने किमान कशी सॅम्पल केसेसची फेर तपासणी रोज करवून या चाचणीत रुग्णांची दिशाभूल होऊ नये याची खबरदारी घेणे अत्यन्त आवश्यक झाले आहे, तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचा सध्या सुरू असलेला काळाबाजार थांबवून सर्व रुग्णांना पुरेल असा ऑक्सिजन साठा उपलब्ध करावा, अशी मागणीही ग्रामीण भागातील जनतेतून प्रकर्षाने होत आहे.


--- बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि