गर्भवती आहाराची पाकीटे पोत्यातून नदीपात्रात फेकली, पुरावा नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस

*************************************************

बेटकबेळी शिवारात आढळलेल्या रिकाम्या पकिटांचा नायगाव तालुका सिडीपीओ कडून पंचनामा , या गंभीर प्रकरणाची चौकशी होणार

*************************************************

नायगाव दि 07- नायगाव तालुक्यातील बेटकबेळी ते मुस्तापुर रस्त्यात बेटकबेळी शिवारातील नदी पात्रात गरोदर मातांसाठी येणाऱ्या खाऊची रिकामी पाकिटे आढळून आल्यामुळे खळबळ उडाली असून खाऊ वाटपात सुरू असलेला भ्रष्टाचार यामुळे उघडकीस आला आहे,

बेटकबेळी शिवारातील नदीपात्रात खाऊ काढून घेतलेली रिकामी पॉकेटे पोत्यात बांधून नाल्यात फेकलेली बाब दि 06 रोजी उघडकीस आली आहे,ही पाकिटे नष्ट करण्याच्या उद्देशाने नाल्यातून वाहून जाण्यासाठी नाल्यात टाकली होती, परंतु ती वाहून न जाता त्याच जागी अडकून राहिल्याने खाऊ वाटपातील सावळा गोंधळ उघडकीस आला आहे.या घटनेचे वृत्त समजताच नायगाव सिडीपीओ ने पंचनामा केला असून हा खाऊ कोणत्या तालुक्यातला आहे याचा शोध चालू झाला आहे, या प्रकाराची कसून चौकशी होणार आहे.असे सिडीपीओ राजुरे यांनी सांगितले.

सदर घटना ६ मार्च ला घडली असून त्याचे वृत्त गावात कळताच बेटकबेळी येथील लोकप्रतिनिधी राहुल पाटील नकाते यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला ही माहिती दिली.या वरून नायगाव तालुक्याचे सिडीपीओ राजुरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी लगेचच सुपरवायजर यांना पाहणीसाठी समोर पाठवले व पुरावा नष्ट करू नये या साठी पाकिटे ताब्यात घेतली व सदर घटनेची माहिती पूर्ण घेऊन पाकिटाचा पंचनामा केला असता ही पाकिटे ही फेब्रुवारी महिन्यात वाटप करण्या साठी आलेली होती हे त्यावरील तारखेवरून कळल्याचे सीडीपीओ यांनी सांगितले.

विशेष म्हणजे नायगाव तालुक्यात फेब्रुवारी महिन्यासाठी माल वाटपच झाला नसून हा माल शेजारच्या बिलोली तालुक्याचा असावा असा अंदाज राजुरे यांनी व्यक्त केला. संबंधितांनी जागेवर जाऊन पंचनामा केला तेंव्हा गहू,चणा व मसूर दाळ अशा सकस आहाराची पाकीटे रिकामी केलेली आढळली आहेत, रिकाम्या पाकिटाने भरलेली ४ पोती घटनास्थळी आढळली आहेत, पाकिटांची संख्या 200 असावी असे सांगण्यात आले.

एका अंगणवाडी मध्ये जास्तीत जास्त गर्भवती महिलांची संख्या 15 ते 20 असू शकते, पण आढळलेली रिकाम्या पाकिटांची संख्या 200 पेक्षा अधिक असल्याने एखाद्या अंगणवाडी कडून हा प्रकार घडला नसावा असा अंदाज राजुरे यांनी वर्तवला असून, हा प्रकार वाटप यंत्रणे कडूनच घडला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

ते म्हणाले की नायगाव तालुक्यात डिसेंबर पर्यंतच गरोदर महिलांचा खाऊ वाटप झाला असून तांत्रिक अडचणी मुळे फेब्रुवारी महिन्याचे वाटप अजून झाले नाही.पण बिलोली तालुक्यातील गरोदर महिलाना फेब्रुवारी महिन्यात खाऊ वाटप झाल्याचे कळले असून त्या मुळे बिलोली तालुक्यातील आसपासच्या गावातील अंगणवाडी भागात राहणाऱ्या गरोदर महिला भगिनी व अंगणवाडी सेविका मदतनीस यांची कसून चौकशी या प्रकरणात केली जाणार आहे.असे राजुरे यांनी भ्रमणध्वनी वरून सांगितले.

या विषयी नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी शिंगणे साहेब, व मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर मॅडम याना संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेण्याचे टाळले या मुळे या प्रकरणाची चौकशी कशी होणार तालुका बालविकास अधिकारी राजुरे यांची जवाबदारी या प्रकरणात वाढली असून या मध्ये दोषींवर काय कार्यवाही होणार याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि