आ.राजेश पवार यांच्या प्रयत्नांना यश , नायगाव येथे 50 खाटाच्या कोविड सेंटरला मंजुरीनायगाव दि 15- मतदारसंघात वाढत चाललेला कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन आ.राजेश पवार यांनी केलेल्या मागणीस जिल्हाधिका-यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे नायगावात लवकरच 50 खाटाचे सुसज्ज कोविड हॉस्पिटल चालू होणार असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे नायगाव विधानसभेचे आ. राजेश पवार यांनी दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वरचेवर वाढ सुरू आहे,या वाढीत नायगावचा क्रमांक 5 वा असून यात सर्वाधिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात आहे. भविष्यात रुग्ण संख्येत अशीच भर पडत राहिली तर नायगाव येथे सध्या असलेल्या कोविड सेंटरच्या प्राथमीक उपचाराने भागणार नाही . सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर असून अनेकांना ऑक्सिजन ची व रेमीडेसावीर ची आवश्यकता भासत आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन नायगावच्या आमदारांनी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर यांना नायगाव येथे कोविड हॉस्पिटल चालू करण्यासाठी विनंती केली ,यासोबतच कर्मचारी निवास व्यवस्था, शस्त्रक्रिया विभाग, त्यासाठी अत्यावश्यक इतर उपकरणे, सोनोग्राफी सेंटर, आदिंची मागणी लावून धरून मागणीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.

नायगाव मतदारसंघातील गोरगरीब जनता, शेतकरी कष्टकरी, व्यापारी यांची गैरसोय होऊ नये व त्यांना आरोग्याच्या अत्यावश्यक सुविधा नांदेड ऐवजी तालुक्याच्या ठिकाणीच उपलब्ध व्हाव्यात हेच उद्दिष्ट लक्ष्यात घेऊन केलेल्या मागणीला जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे त्यामुळे शहरात लवकरच 50 खाटाचे कोविड हॉस्पिटल चालू होणार आहे.

शिवाय नायगाव ग्रामीण रुग्णालयही अद्ययावत होणार असून नायगाव ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स ची संख्या आहे,परंतु येथे त्यामानाने तालुक्यातील फार कमी लोकांचा इलाज होतो. त्यामुळे या ठिकाणी ऑक्सिजन युक्त्त खाटा ( कोरोना आणि इतर क्रिटिकल आजारांसाठी उपयुक्त ) नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, अद्ययावत शस्त्रक्रिया कक्ष, डॉक्टर्स साठी निवासी व्यवस्था, सोनोग्राफी सारखी उपकरणे, परिसर सुशोभीकरण, सर्व प्रकारचे दुरुस्ती चे काम हाती घेण्यात येणार आहे.

या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी बुधवारी नांदेड चे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना दवाखान्यात येण्याची विनंती आ राजेश पवार यांनी केली होती त्या प्रमाणे बुधवारी दुपारी ते आले होते या वेळी संपूर्ण आढावा घेउन पुढील कामांचे नियोजन केले. 50 खाटांच्या कोरोना दवाखाना आणि ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प मंजुर केल्याबद्दल नायगाव मतदार संघाच्या वतिने जिल्हाधिकारी श्री विपीन इटनकर, नांदेड जिल्ह्याचे शल्य चिकित्सक नीलकंठ भोसीकर यांचे आमदार राजेश पवार व नायगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डाँ हनुमंत गुंटूरकर यांनी आभार मानले. आ. राजेश पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती देऊन प्रशासनाचे कौतुक व आभार व्यक्त केले आहेत.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि