कोविड ची लस सुरक्षित, सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे घ्यावी - बाळासाहेब पांडे मांजरमकर


नायगाव दि 17- कोविशिल्ड पुणे व्हॅकसीन अत्यंत निर्धोक,सुरक्षित असून सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या सरंक्षणा साठी घ्यावीच असे आग्रही आवाहन मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे मांजरमकर यांनी केले आहे.

दिनांक 17 मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे नोडल अॉफीसर डॉ. नरेश देशपांडे देवणीकर व वैद्यकीय अधिक्षक डॉ. हनुमंतराव गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविल्ड शिल्डची लस जेष्ठ पत्रकार तथा अध्यापक बाळासाहेब पांडे यांनी घेतली.

या वेळी बाळासाहेब पांडें यांनी सांगितले की, कोविशिल्ड लस पूर्णपणे सुरक्षित असून ५० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनींनी कसलीच भिती न बाळगता त्वरित घ्यावी,सोबत आधार कार्ड घेऊन येऊन सकाळी १० ते ५ या वेळेत ग्रामीण रूग्णालय नायगाव बा. येथे तसेकंग प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम, बरबडा, कुंटुर येथे जाऊन लस घ्यावी. अशी विनंती व आवाहन केले पांडे यांनी केले आहे.


सध्याची सर्वत्र कोरोना धोक्याची तलवार टांगतीच आहे,सतत भीतीच्या सावटाखाली जगण्याऐवजी कोविशिल्ड लस घेऊन आपली मानसिक भीती कायमची दूर करावी व आपली इम्युनिटी पावर वाढवून घ्यावी , प्रशासन आरोग्य यंत्रणा यांना सहकार्य करावे असे आवाहन बाळासाहेब पांडे यांनी इतरांना केले आहे.पांडे यांनी लस घेणाऱ्या नागरिकांना प्रमाण पत्र देण्यात यावे अशी ही मागणी यावेळी केली

या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी दुरणाळे,यमुनाबाई प्राथमिक शाळा नायगाव च्या मुख्याधिपिका सुनंदा बाळासाहेब पांडे,पत्रकार साहेबराव मेळगावकर,सौ मेळगावकर आदीनी ही लस घेतली.

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि