मांजरम वाडी ग्रामस्थांनी गायी चोरून नेणाऱ्या टोळीस रंगेहात पकडून केले पोलिसांच्या हवाली


नायगाव दि 08 - श्रद्धेच्या भावनेतून देवाला सोडलेल्या चार मोकळ्या गायी टेम्पो मध्ये डांबून चोरून नेणाऱ्या आरोपीस मांजरम वाडी येथील ग्रामस्थांनी रंगेहात पकडले व त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना 6 मे च्या मध्यरात्री घडली. नायगाव पोलिसात या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायी चोरून नेण्यासाठी वापरण्यात आलेला टेम्पो व एक मोटार सायकल एकूण मुद्देमाल 3 लाख 60 हजार व आरोपी यांना नायगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या बाबत अधिक वृत्त असे की मांजरम वाडी ता. नायगाव येथील हनुमान मंदिरास काही भाविकांनी चार गायी सोडल्या होत्या , त्या दिवसभर चरून रात्री जि.प.शाळेसमोरील मोकळ्या जागेत विश्रांती साठी बसत असतात. याचा पत्ता ठेऊन मांजरम गावातील कसाई इसाक अब्दुल कुरेशी,बाबू अब्दुल कुरेशी,अहमद कुरेशी यांनी 6 मेच्या मध्यरात्री 12 वाजता आपे टेम्पो क्र.26 ए डी.8227 मध्ये या गायी टाकून पळवण्याचा प्रयत्न केला.

ही जनावरे चोरून नेत असतांना झालेल्या आवाजामुळे गावातील काही ग्रामस्थ जागे झाले व त्यांनी संबंधीत चोरट्याना रंगेहाथ पकडले. त्यानंतर तत्काळ नायगाव पोलीस ठाणे येथे गायी सह टेम्पो व चोरी प्रकरणात वापरलेली एक मोटारसायकल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली, ग्रा.प.सदस्य खाकू व्यंकटी उलगुलवाड वय 27 वर्ष यांच्या फिर्यादीवरून चार गायी अंदाजे किंमत 50 हजार,एक टेम्पो 3 लाख,व मोटार सायकल 19 हजार जप्त करून नायगाव पोलिसांनी वरील तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, यातील एक आरोपी अहमद कुरेशी पकडले जाण्याचा अंदाज येताच पळून गेला असून इसाक कुरेशी व बाबा कुरेशी यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास मांजरम पोलिस चौकीचे पो.हे.कॉ.शेख हे करीत आहेत.क्षुल्लक आर्थिक स्वार्थासाठी वाईट हेतूने स्थानिक ग्रामस्थांच्या श्रद्धेचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी परिसरातून व्यक्त होत आहे.


--- बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि