धानोरा येथे संपत्तीच्या वादातून भावाचा संशयास्पद मृत्यू, चार बहिणी,भाचे,भावजी विरुद्ध गुन्हा दाखल


नायगाव दि 17- तालुक्यातील धानोरा त.मा.येथे एका इसमाचे प्रेत संशयास्पद रित्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले असून प्रारंभी रामतीर्थ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती,परंतु मयताच्या नातेवाईकानी बहीण भावाच्या संपत्तीच्या न्यायालयीन वादावरून हा मृत्यू झाल्याचा आरोप केल्यानंतर सदर प्रकरणास वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

रामतीर्थ पोलिसांनी मयतास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून चार बहीणी, चार मेव्हणे,व चार भाच्या विरुद्ध रामतीर्थ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.बहीण भावाच्या संपत्तीच्या वादात भावाचा गूढ मृत्यू झाला असल्याने नायगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत अधिक वृत्त असे की कलयुगात विपरीत घडते याची प्रचिती नायगाव तालुक्यातील उपरोक्त घटनेवरून येत आहे. टाकळी त.मा. येथील रहिवासी तुळशिराम दत्ता झेलेकर वय 50 वर्ष , व त्यांच्या चार बहिणी केराबाई शेषेराव गोरगे रा धानोरा त.मा.,चंदर बाई धोंडिबा गिने रा मुगाव,सुनीता हणमंत बोडके रा.पोकर्णी,अनिता अशोक लव्हाळे, रा सालेगाव ,यां बहीण भावात वारसाने संपत्ती मिळवण्याचा दोन वर्षा पासून नायगाव कोर्टात वाद चालू आहे. या संदर्भात अनेक बैठकाही निष्पळ झाल्या होत्या.

अशीच समझोत्याची बैठक आहे म्हणून मयत तुळशीराम याना धानोरा येथे 16 मार्च रोजी मेव्हणा शेषेराव गोरगे यांनी मयताचा मुलगा अर्जुन जवळ निरोप देऊन बोलावून घेतले.मयत तुळशीराम हा टाकळी त.मा.येथून गेला.पण परत आला नाही.या मुळे मयताच्या नातेवाईकांचा संशय बळावला वडील मुलगा अर्जुन तुळशीराम झेलेकर हा 17 मार्च रोजी सकाळी वडिलांच्या शोधार्थ टाकळी त.मा.रस्त्याने पायी निघाला असता काही महिला त्याला भेटल्या व त्यांना विचारपूस केली वेगळीच माहिती त्याला कळाली, धानोरा शिवारात पश्चिम दिशेला शेषेराव गोरगे यांच्या शेतात मयताचे प्रेत झाडाला लटकलेले त्याला आढळून आले.

मयताच्या मुलाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहिले असता हा त्याला हा मृत्यू संशयास्पद वाटला, अर्जुन यांनी आपल्या इतर नातेवाईकांना घटनेची माहिती दिली नंतर रामतीर्थ पोलिसाना माहिती कळवली.पोलीस घटना स्थळी आल्या नंतर नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा दाखल झाल्या शिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला, रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यानी मयताच्या नातेवाईकाना शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्याचे आश्वासन दिल्या नंतर तब्बल सहा तासा नंतर प्रेत उत्तरीय तपासणी साठी नायगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

या प्रकरणात नातेवाईकांनी अशी माहिती दिली की, की मृत व्यक्ती तुळशीराम हा टाकळी त.मा. येथील रहिवासी आहे त्यास दहा एकर भिजवणी खाली जमीन आहे, संपत्ती त्या संपत्तीबाबत त्याच्यात व चार बहिणीत बऱ्याच दिवसापासून वाद आहे.विशेष म्हणजे या पूर्वी तुळशीराम यांचे वडील दता झेलकर यांचा ही धानोरा येथे गोरगे यांच्याच घरी मृत्यू झाला असून,जमिनीच्या वादातून चार बहिणी व त्यांचे पती, व मुलांनी भावाला संपवण्याचा हा प्रकार केला असल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला आहे.मयत तुळशीराम यास दोन मुले,सुना,नातवंडे ,दोन मुली,असा परिवार आहे. पत्नीचेही दोन महिन्या पूर्वी याच वादाच्या तणावामुळे अपघाती मृत्यू झाल्याचा आरोप ही नातेवाईकांनी केला आहे.

मयताचा मुलगा अर्जुन तुळशीराम झेलेकर रा टाकळी त मा यांच्या फिर्यादि वरून आरोपी केराबाई शेषेराव गोरगे बहीण,शेषेराव गोरगे भावजी ,रा धानोरा त.मा.चंदर बाई धोंडिबा गिने बहीण व मेव्हणा धोंडिबा गिने रा मुगाव,सुनीता हणमंत बोडके बहीण,हणमंत बोडके रा.पोकर्णी,ता बिलोली,अनिता अशोक लव्हाळे, बहिण व अशोक लव्हाळे रा सालेगाव ता नायगाव व अन्य चार भाचे यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत.पुढील तपास रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी हे करीत आहेत


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि