दरेगाव मध्ये संभाजी पाटील शिंदे यांच्या पॅनालचा दणदणीत विजय


नायगाव दि 24 दरेगाव ता.नायगाव ग्राम पंचायत निवडणुकीत संभाजी विठल पाटील शिंदे यांच्या शेतकरी, कष्टकरी,दिंनदुबळ्याच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला असून सात पैकी पाच जागेवर विजय मिळवत दरेंगाव ग्राम पंचायती मधील सताधारी भोपाळे गटाचा शिंदे गटाने दारुण पराभव केला आहे.या निवडीने दरेगावात सत्तां परिवर्तन झाले आसून.माजी सरपंच कै. विठल पाटील शिंदे यांच्या गटाने पुन्हा एकदा दरेंगाव या दर्या खोऱ्यात वसलेल्या गावची सूत्र हाती घेतली आहेत.

संभाजी पाटील शिंदे यांनी ग्रामविकासाच्या ध्यासातून आपले पॅनल उभे केले.त्यांचे पॅनल गावकऱ्यांच्या प्रतिसादामुळे बहुमताने विजयी झाले. नायगाव तालुक्यातील दरेगाव गाव अतिशय दर्या खोऱ्यात असून तांडा वस्ती असलेले गाव आहे .ही वस्ती अगदी माळ रानात आहे. गेल्या पंचवार्षिक मध्ये सत्ते वर असलेल्या ग्राम पंचायत करभाऱ्यांनी विकास कामा कडे दुर्लक्ष केल्याने गावकर्यांनी सता परिवर्तित केली आहे असे पॅनल प्रमुख संभाजी शिंदे यांनी सांगितले.

पॅनल प्रमुख संभाजी शिंदे यांच्या सौभाग्यवती शोभा ताई संभाजी शिंदे या सुशिक्षित महिलेने निवडणुकीच्या रणांगणात उतरून ग्रामपंचायतीवर चांगले प्रशासन चालवून दाखवण्याची इच्छा प्रगट केली व त्यांच्या आवाहनाला गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला, निवडणुकीच्या पहिल्याच पदार्पणात 7 पैकी 5 जागेवर शिंदे गटाने विजय मिळवला आहे.

या पॅनलचे विजयी उमेदवार याप्रमाणे सौ.शोभाबाई संभाजी शिदे ,सौ. स्वाती चद्रप्रकाश शिंदे,संतराम रामा रामशेटवाड,सौ अरुणा गणेश गजलवाड,मोहन इरबा बैलके, या विजयी उमेदवाराचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि