स्व.डी.बी पाटील होटाळकर यांच्यासारखा धैर्यशील मित्र गमावल्याची मनात कायम सल -खा.प्रताप पा.चिखलीकर

खा.चिखलीकर यांच्या हस्ते डी.बी.पाटील होटाळकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेचे भूमीपूजन संपन्न

नायगाव दि 15- नायगाव तालुक्यातील आघाडीचे ठळक नेते कै.डी.बी.पाटील होटाळकर यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या पुतळा उभारणीचे कार्य सुरू केले असून डिबींचे जिवलग स्नेही तथा नांदेड चे खा.प्रतापराव प.चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजित पुतळ्याच्या जागेचे भूमीपूजन संपन्न झालेया भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना खा.चिखलीकर म्हणाले की, डी.बी.पाटील होटाळकर यांच्या निधनानंतर एक सच्चा, धैर्यशील, दातृत्ववान जिवलग मित्र गमावल्याच्या वेदना आजही मनाला सातत्याने होत बोचत आहे, त्या भव्य व्यक्तिमत्वाची ठळक वैशिष्ट्ये व त्यांच्या जीवन कार्याबद्दल असलेल्या अत्यन्त जिव्हाळ्याचा आठवणी मात्र मनामध्ये कायमरित्या घर करून राहणार आहेत, एक सच्चा व दिलदार मित्र गमावल्याने मला झालेले दुःख मी माझ्या जीवनात कधीही विसरू शकत नाही .होटाळकर परिवाराने त्यांच्या अर्धकृती पुतळा उभारणीचा निर्णय अतिशय स्तुत्य असून डिबींच्या कर्तृत्वाची जाणीव सदैव जीवनात ठेवणारा हा निर्णय आहे.असेही खा.प्रताप पाटील चिखलीकर आपल्या अत्यंत भावुक भाषणात म्हणाले

दिवंगत नेते डी.बी.पाटील होटाळकर यांच्या 60 व्या जयंती निमित्त 14 मार्च रोजी मिलिनीयम इंग्लिश स्कुल च्या मैदानावर संपन्न झालेल्या नियोजित पुतळ्याच्या जागेचे भूमी पूजन संपन्न झाले, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते,या कार्यक्रमात स्व.डी. बी.पाटील यांच्या असंख्य चाहत्यांनी आवर्जून हजेरी लावली होती, मा.गोरखनाथ महाराज औसेकर,आ.राम पाटील रातोळीकर ,माजी आ.बापूसाहेब देशमुख गोरठेकर , व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, हणमंतराव पाटील चव्हाण, बाबाराव यम्बडवार, अरविंद पाटील,बाबूराव लंगडापूरे, गोपाळराव पाटील शिंदे.राजेश देशमुख कुटूरकर, वैजनाथ जाधव , लक्ष्मणरावजी ठक्करवाड ,श्रावण पाटील भिलवंडे, ,दिलीपराव धर्माधिकारी ,बालाजी बच्चेवार ,माणिकराव लोहगावे ,संभाजी पाटील भिलवंडे, किशोर देशमुख.सय्यद रहिम सेठ .कोंडीबा पाटील शिंदे,उत्तम पाटील शेळगावकर, रविंद्र पाटील भिलवंडे, संजय पाटील इज्जतगावकर, आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

कार्यक्रमात प्रास्ताविकातून माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी भावनांचा बांध मोकळा केला, अन्नाच्या जाण्याने झालेले दुःख सागरा पेक्षाही मोठे असून आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाच्या बळावर या दुःखातून तरुन जाण्या साठी आपल्या आपुलकीची वेळोवेळी गरज आहे अशी भावपूर्ण अपेक्षा व्यक्त केली. या वेळी आ.राम पाटील रातोळीकर,माजी आ.बापूसाहेब गोरठेकर,वेंकटराव पाटील गोजेगावकर,बाबाराव एम्बडवार,बाबुराव लंगडापुरे,आदी मित्रवर्य नातेवाईक यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमास दत्तू पाटील होटाळकर,सिंधुताई होटाळकर ,जयश्री पावडे,रावनगवकर ताई,राहुल पाटील नकाते,देविदास पाटोल बोंमनाळे,विनायक पा.शिंदे, गंगाधर पाटील कल्याण,माधव पाटील कल्याण, सुरेश पाटील खडगावकर,लक्ष्मण देग्लुरे, राजीव गंदिगुडे,शिवाजी पा. पवार, एन.डी.पवार, बालाजी पवार गोळेगावकर, गणेश पाटील पवार होटाळकर, कुमुद पटेल,मुना वडजे,हरीचंद चव्हाण,शिवाजी वडजे,गँगजी पा.मुगावकर,शिवा पाटील गडगेकर, या सह परिसरातील चेअरमन, सरपंच, ग्रा.प.सदस्य, पत्रकार,व्यापारी व होटाळकर परिवारावर प्रेम करणारे मित्र नातेवाईक दत्त शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व प्राचार्य,कर्मचारी, अनेक मान्यवर उपस्थित होते.. कोरोनाच्या पार्शवभूमीवर काळजी घेत कार्यक्रम घेण्यात आला.संचलन आभार दिलीप पांढरे यांनी केले.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि