ग्रामीण भागातील विकास कामांना मंजुरी देण्याची रवींद्र भिलवंडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

नायगाव दि 29- जिल्हा वार्षिक योजना (DPDC) सन २०२१- २०२२ अंतर्गत सार्वजनिक हिताच्या विविध आवश्यक कामासाठी निधी मंजुर करन्याची मागणी शिवसेना ता.प्रमुख रवींद्र भिलवंडे यांनी नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडे केली आहे.

नायगाव तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे, हे रस्ते दळणवळणासाठी अत्यंत आवश्यक असे आहेत,परन्तु त्यांची दुरवस्था झाली असून या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी (DPDC) जिल्हा विकास नियोजन अंतर्गत निधी मंजुर करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून भिलवंडे यांनी केली आहे.

निधी मागण्यात आलेली कामे यानुसार नरसी ता. नायगाव येथील शासकीय विश्राम गृह परिसरात संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे

,जोडरस्ता कार्ला पाटी ते कार्ला रस्त्याची पुल व मोऱ्या सह दुरूस्ती करणे ,जोडरस्ता कुचेली गाव ते नाथोबा मंदिरापर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ग्रामीण मार्ग उपलब्ध करुन देणे आदी कामासाठी त्वरित निधी देण्याची मागणी ता.प्रमुख रवींद्र भिलवंडे यांनी निवेदनातून केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात चालु असलेली कामे प्रगतीपथावर असून उर्वरित वरील कामांनाही मंजुरी देऊन प्रशासन स्तरावर विकास कामात भर टाकावी अशी मागणी करण्यात आली आहे.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि