संचारबंदी काळात मायक्रो फायनान्सच्या वसूलीवर तात्पुरती स्थगिती देण्याची आसीफ नरसी कर यांची मागणी

*************************************************

दुकाने बंद असल्याने व्यवहार ठप्प,मग हप्त्याची परत फेड कशी करावी या प्रश्नाने जनसामान्य हवालदिल

*************************************************

नायगाव दि 21 - राज्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुर्ण राज्यात १५ एप्रिल ते १ मे पर्यंत १४४ कलम संचारबंदी लागू केली आहे कडक निर्बंधासह नियम तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले यामुळे विनाकारण बाहेर फिरता येणार नसल्याने छोट्या,छोट्या व्यापाऱ्यांना व मजूरदारांना या परिस्थितीचा मोठा फटका बसला असून आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी कर्ज घेतलेल्या खाजगी फायनान्स,मायक्रो फायनान्स चे हाप्ते भरण्याची मोठीं अडचण निर्माण झाली आहे, लॉकडाऊन घ्या काळात मायक्रो फायनान्सवर तात्पुरती बंदी घालून त्यांच्याकडून करण्यात येणारी वसूली थांबवावी अशी महत्वाची मागणी आसीफ नरसीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

छोटया -मोठ्या व्यावसायिकांनी आपला रोजगार चालवण्यासाठी मायक्रो फायनान्स (प्रायवेट फायनान्स) महिलांच्या नावे उचलून उदरनिर्वाह चालवला आहे, या कर्जाची व नियमित परतफेड ही सुरू आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना व्हायरसचे मोठे संकट आल्याने या महामारीला रोखण्यासाठी शासनाच्या वतीने ब्रेक द चेन ही कडक निर्बंधासह नियमावली लागू केली आहे १५ एप्रिल ते १ मे पर्यंत पुर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे याकाळात लोकांनी घराबाहेर न पडता घरीच राहण्याचे आवाहन सुरू आहे, यामुळे गोर गरीब जनता हाताला कामच मिळत नसल्याने घरीच बसले आहेत तर छोट्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद असल्याने त्यांचा व्यवहार पूर्णपणे।ठप्प झाला आहे आपला उदरनिर्वाह व व्यापार चालवण्यासाठी काही प्रायवेट फायनान्स,मायक्रो फायनान्स कडून आठवडा,पंधरवडा व महिनेवारी असे महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेकांनी कर्ज घेतले आहे यामुळे या लोकांना संचारबंदीचा मोठा फटका बसला आहे त्यांची दुकाने व व्यवहार पुर्णतः बंद असल्याने प्रायवेट फायनान्स वाल्याकडून घेतलेले कर्ज परत फेडण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली , कमावता माणूसच रिकामा घरी बसून असल्यामुळे प्रत्येकजण हैराण झाला आहे आपले व कुटुंबियांचे उदरभरण हाच प्रश्न या काळात उग्र झाल्यामुळे कर्जा चे हप्ते भरणे निव्वळ अशक्य असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले आहे मात्र सदर कंपणी व मायक्रो फायनान्स कडून कर्जदात्याकडून सक्तीची वसुली करण्यात येत आहे वसूलीसाठी ठरवलेल्या दर आठवड्याला बैठकीमध्ये कर्ज घेतलेल्या सर्व महिला एकत्रित जमा होत असल्यामूळे संचारबंदीचेही उल्लंघन होत आहे यामुळे मा.जिल्हाधिकारी साहेबांनी वरील सर्व बाबींचा विचार करून संचारबंदी व लॉकडाऊनच्या काळात विविध मायक्रो फायनान्स (प्रायवेट फायनान्स) यांच्याकडून करण्यात येणारी सक्तीची वसूली थांबवावी व गोर गरीब जनतेला न्याय द्यावा अशी महत्वाची मागणी शेख आसीफ नरसीकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे,या न्याय मागणीवर जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार याकडे असंख्य कर्जदारांचे अत्यन्त आशेने लक्ष लागून आहे.


---बाळासाहेब पांडे, मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि