पाच हजारांची लाच मागणारे धर्माबादचे कृषी पर्यवेक्षक हनवते यांना सापळा रचून रंगेहात अटक


नांदेड दि 10- ठिबक संचासाठी उपलब्ध असलेले शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी पाच हजारांची लाच मागणारे धर्माबाद कृषी कार्यालयातील पर्यवेक्षक दीपक शंकरराव हनवते (कोळीकर) वय 57 यांना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून रंगेहात पकडल्याची घटना मंगळवार दि 09 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली

आरोपी लोकसेवक दीपक शंकरराव हनवते( कोळीकर) कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी कार्यालय धर्माबाद (राहणार रायगड नगर एमजीएम कॉलेजच्या बाजूला, नांदेड) यांनी एका 30 वर्षीय तक्रारदारास ठिबक संचा साठी मिळणारे अनुदान शिफारस करण्यासाठी पाच हजारांची मागणी केली, सदरील तक्रारदाराने दि 05 फेब्रुवारी रोजी याबद्दल नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक वीभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली,खात्याच्या पथकाने दि 09 फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली व सायंकाळी सापळा रचून आरोपीस जेरबंद केले,सेवानिवृत्तीस केवळ एक वर्ष उरले असतांना संबंधित लोकसेवकाने लालसेपोटी आपले भविष्य बरबाद करून घेतल्याचे दिसून आले,

श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक,

श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, श्री. विजय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड आदींच्या मार्गदर्शनाखाली

श्री. एसएल नितनवरे ला.प्र.वि. नांदेड

ACB नांदेड टीम पोना किसन चिंतोरे , हनुमंत बोरकर ,पोकॉ अमरजीत सिंग चौधरी चालक पोना मारोती सोनटक्के आदींच्या पथकाने पंचाच्या मदतीने ही कारवाई नांदेड येथे यशस्वी केली


---श्रीकांत देव

मुख्य संपादक, नांदेडवैभव


Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि