बेमुदत धरणे आंदोलनास विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा,जिल्हाधिकाऱ्यांनीच जनक्षोभाची दखल घेण्याची मागणी


नायगाव दि 25 -तालुक्यातील मौजे मेळगाव, होटाळा,कुष्णुर, अंतरगाव येथील विविध गट क्रमांक मध्ये किरकोळ परवानगीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम उत्खनन केलेल्या संबंधित व्यक्ती व संबंधित महसूल अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यासाठी,तसेच घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे नायगाव तहसील येथे बेमुदत धरणे आंदोलन चालू असून त्यांना विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.‌

धरणे आंदोलकांच्या मागण्या निव्वळ जनहितार्थ व सर्वसमावेशक असून आपल्या कर्तव्यात कसूरपणा दाखवणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे व परवानगीच्या नावावर शासनाचा महसूल आपल्या घशात घालणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई व्हावी,गरीब घरकुल लाभार्थ्यांची घरे रेती अभावी पूर्णत्वाकडे गेले नसल्याने त्यांना त्वरित मोफत रेती मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते माधव बैलकवाड,विश्वम्भर वन्ने,शेख आरीफ आदींन्नी सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास दलित कैवारीचे संपादक प्रकाश भाऊ हणमंते ,अ.भा. बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक असोसिएशनच्या मराठवाडा अध्यक्षा सौ. सोनाली हंबर्डे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील शिंपाळकर, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षा सौ. आशा उत्तमराव पांचाळ, जिल्हाध्यक्ष शंकरराव मावळगे,महाराष्ट्र डेबुजी फोर्सचे प्रदेशाध्यक्ष कैलास तेलंग, मराठा महासंग्रामचे जिल्हाध्यक्ष साईनाथ पांढरे, रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष गौतम जोंधळे, कोळी महासंघाचे जिल्हा सचिव उत्तम रोडेवाढ, कैलास भालेराव यासह संदीप कांबळे, किरण वाघमारे, सुरज बेळगे, अविनाश चव्हाण, तेजराव पाटील, शंकर चव्हाण, मोहन जाधव, प्रकाश वाघमारे, महिला प्रतिनिधी सौ. प्रतिभा बोधने,सौ. सुरेखा पबितवार, जयश्री पांचाळ यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला असून रात्री उशिरापर्यंत हे सदर आंदोलन चालूच होते.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि