पाच वर्षांच्या चिमुकली वर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा

भोकर, दि 23- केवळ पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खुन करणारा नराधम आरोपी बाबुराव सांगेराव याच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने भोकर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी त्याला दि.२३ मार्च रोजी फाशीची कठोर शिक्षा सुनावली.

भोकर तालुक्यातील दिवशी (बु.)येथील एका शेतकऱ्याच्या पाच वर्षीय चिमुकलीवर सालगड्याने गावलगतच्या नदीपात्रात लैंगिक अत्याचार केला,व आपले दुष्कर्म उघडकीस येऊ नये या उद्देशाने तिचा खून केला, .२० जानेवारी २१ रोजी ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली होती. या अमानुष अत्याचाराचा सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात आला होता. विविध सामाजिक संघटना व सर्व राजकीय पक्षा तर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी भोकर पोलीसांनी अत्यंत तीव्र गतीने तपास यंत्रणा राबवून पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ १९ दिवसात दोषारोप पत्र अति सत्र न्यायालय १ मधे दाखल केले.आरोपी बाबुराव सांगेराव याने गावकऱ्यां समोर गुन्ह्याची कबुली दिली होती.सरकार पक्षातर्फे एकुण १५ साक्षीदार तपासण्यात येवून फिर्यादी साक्षीदाराचे साक्षपुरावा,वैद्यकीय पुरावा व आरोपी विरुद्ध सबळ पुरावा या आधारे आरोपीस दोषी ठरवत कलम ३६३,३०२,३७६(अ),३७६(२)(जे)(एम),३७६(अब),३७७ भादवी व कलम ४,६,८,१०,१२ पोस्को कायद्या प्रमाणे फाशीची शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अँड.रमेश राजुरकर यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी एपीआय डेडवाल व पोहेकाँ फिरोज खाँ पठाण यांनी काम पाहिले.न्यायालयाने जलदगतीने न्यायनिवाडा करून केवळ २३ दिवसात मयत चिमुकलीला न्याय मिळवून दिल्याची प्रतीक्रिया समाजातील सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.


---श्रीकांत देव,

मुख्य संपादक, नांदेड वैभव

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि