एम बी बी एस मध्ये यश मिळवल्या बद्दल डॉ.शेख नजमा यांचे सर्वत्र अभिनंदन


नायगाव,दि 26 - तालुक्यातील गडगा येथील रहिवासी तथा नाथोबा माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शेख एच. डी. नंदुरकर यांची कन्या शेख नजमा हिने नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एमबीबीएस (MBBS) ची अंतिम वर्षाची परीक्षा ६७% गुण घेऊन उत्तीर्ण करून स्पृहणीय यश मिळविले आहे.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नायगाव च्या ब्लू बेल्स इंग्लिश स्कूल मध्ये येथे ई.१० वी ९६.३६ % व यशवंत महाविद्यालय, नांदेड येथून १२ वी ९३% गुण घेऊन ती उत्तीर्ण झाली होती, त्यानंतर CET परीक्षेत २०१६ मध्ये २०० पैकी १८४ गुण घेऊन तिने एमबीबीएसला प्रवेश मिळविला. दि.२६.०४.२०२१ रोजी एम बी बी एस चा निकाल लागला असून तिने चांगल्या गुणाद्वारे एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली आहे.तिच्या या यशाबद्दल ग्रामीण भागातील सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


---बाळासाहेब पांडे, मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि