तलाठी संघटनेच्या पुढाकारातून लोहा तहसील कार्यालयात पाणपोईची व्यवस्था


सोनखेड दि 19- उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून ठिकठिकाणी सेवाभावी वृत्तीने उन्हाळा कालावधीत नागरिकांसाठी पाणपोई व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे उपक्रम सुरू झाले आहेत,लोहा येथील तलाठी संघटनेच्या पुढाकारातून लोहा तहसील प्रांगणात ग्रामीण नागरिकांची तहान भागवण्यासाठी पाणपोई चे उदघाटन करण्यात आले

सध्याचे कोविड संकट लक्षात घेता सर्व आवश्यक खबरदारी घेऊनच ही पाणपोई उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच फिल्टर केलेले जंतू रहित शुद्ध व थंड पाणी या पाणपोई वर उपलब्ध केले जाणार आहे,लोहा तहसीलच्या तलाठी व कर्मचाऱ्यांनी समाज ऋण फेडण्याचा भावनेतून हा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यासाठी आर्थिक हातभार लावला आहे, या पाणपोईच्या उदघाटन प्रसंगी उपविभागीय अधिकारी पांडुरंगराव बोरगावकर,तहसीलदार विठ्ठलराव परळीकर,नायब तहसीलदार अशोक मोकले,देवराये,मंडळ अधिकारी डी एल कटारे,तलाठी मारोती कदम,संदीप कल्याणकर,संदीप फड,इंगळे, कावळे,अश्विनी गिरडे,पूजा कुंटुर कर, आदी अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते


---माणिकराव मोरे,

पत्रकार, सोनखेड

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि