उभ्या ज्वारीच्या पिकात जनावरे सोडली व जाती वाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी नायगाव पोलिसात गुन्हा दाखल

नायगाव दि 30- आधी शेतात उभ्या ज्वारीच्या पिकात जनावरे सोडली व शेतकऱ्याने आपल्या शेतात अशी जनावरे का सोडली असा जाब विचारला असता जातीवाचक व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या खैरगाव ता.नायगाव येथील तिघांवर जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे,

खैरगाव ता नायगाव येथील रहिवासी यादव भुजगा घटेवाड वय 60 वर्ष यांच्या शेतात सध्या टाळकी ज्वारीचे पीक उभे आहे,या पिकात गोविंद गणपती शिंपाळे,हणमंत गणपती शिंपाळे,प्रताप शँकर शिंपाळे हे जनावरांना चारवत होते.आपल्या पिकाचे होत असलेले नुकसान पाहून घंटेवाड यांनी त्यांना विरोध केला व जनावरे शेताबाहेर काढण्यास सांगितले, यामुळे शिंपाळे बंधूनी जातीवर जाऊन उलट शेतमालकालाच अर्वाच्य शिविगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली अशा आशयाची फिर्याद शेतकरी घटेवाड यांनी दिली आहे.

या वरून उपरोक्त तिन्ही आरोपी गोविंद गणपती शिंपाळे,हणमंत गणपत शिंपाळे ,प्रताप शंकर शिंपाळे सर्व रा.खैरगाव ता.नायगाव विरुद्ध गुन्हा रजिस्टर न.61 /2021,कलम 296,506,34 भादवी कलम 3 (1),(r),(s)अजक प्रतिबंध कायदा या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपी फरार आहेत.पुढील तपास स्वतः उप विभागीय पोलीस अधीक्षक बिलोली धुमाळ साहेब हे करीत आहेत.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि