मांजरम   परिसरात गारपीट, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, वीज पडून म्हैस व वासरू जागीच ठार

*************************************************

कोरोना महामारीच्या संकटासह मांजरम परिसरात अवकळी पावसाचा पंधरा दिवसात दुसऱ्यांदा फटका..!

*************************************************


नायगाव दि 26 - मांजरम परीसरात दि.13 एप्रिलनंतर आज दि 26 एप्रिल रोज सोमवारी  सायंकाळी पाच च्या दरम्यान  सोसाट्याचा वारा , गारा,विजांच्या कडकडाटासह जोरदार  पाऊस पडला,यावेळी येथील शेतकरी श्रीराम गणपतराव शिंदे यांच्या शेतातील दावणीला बांधलेली म्हैस व वासरू वीज पडून जागीच मृत झाल्याची घटना घडली,परिसरातल्या शेतातील उन्हाळी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेल्या हळदीच्या पिकाचेही प्रचंड नुकसान झाले असल्याने या भागातील शेतकरी खरोखर हवालदिल झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या धास्तीने लोक भयभीत झाले आहेत, लॉकडाऊन मुळे परेशानही झाले आहेत , हाताला काम नसल्याने बेजार झाले आहेत, आधीच घायकुतीला आलेले सर्वसामान्यांचे जनजीवन सलग दुसऱ्यांदा झालेल्या अवकाळी थैमानाने अत्यन्त हवालदिल झाले आज,दि 13 नंतर आज अचानक गारासह पडलेल्या या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे या भागातील शेतकरी अक्षरशः सुन्न झाल्याचे दिसून आले.

मांजरम ता नायगाव येथील गावाच्या पश्चिम दिशेला दरेंगाव वाटेवरील असलेल्या श्रीराम गणपतराव शिंदे यांच्या शेतात दावणीला बांधलेले म्हैस व वासरू आज वीज पडून जागीच मृत्यू पावले,या दुर्घटनेत या शेतकर्याचे एक लाखाच्या वर नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे त्याच्या शेजारीच असलेले शेतकरी कुटुंबीय व काही जनावरे सुदैवाने बालंबाल बचावली आहेत.

       मांजरम सह काही भागात सध्याच्या स्थितीला बहुतांश ठिकाणी  कापणी , हळद काढणी ,  भुईमूग काढणी चालू असून शिजवलेल्या हळदीचे ही आजबरेच नुकसान झाले आहे.तर उन्हाळी ज्वारी व जनावरांच्या चाऱ्याचे ढीग आडवे पडून मोठ्या प्रमाणात वेगळे नुकसान झाले आहे   बऱ्याच ठिकाणी छपरे पत्रे टाकून तयार केलेल्या शेड चेही मोठे नुकसान झाले आहे.

अचानक सुरू झालेला पाऊस आणि   गार हवा व यामुळे लोकांच्या प्रकृतीला बाधा होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. या पूर्वी अनेक वेळा अशाच अचानक आलेल्या पावसात आणि गारपीटीत मोठे नुकसान झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती आज पहायला मिळाली . या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे 13 एप्रिल चे पंचनामे होऊन आठ दिवस ही झाले नाही तो पुन्हा हे नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे, आता मात्र शेतकऱ्याच्या नशिबात नुकसानीची हद्द झाली अशी उद्वेगजन्य प्रतिक्रिया युवा शेतकरी रामदास गणपत शिंदे,विश्वनाथ गोविंद शिंदे,गोविंद जाधव,शहदत गायकवाड,पंडित शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.महसूल विभागाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करावेत आणि आगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला योग्य न्याय देऊन मोबदला द्यावा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.


--- बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि