नायगाव येथील स्टेट बँकेच्या दोन्ही शाखेच्या वतीने दत्तक गावातील नवनिर्वाचित सरपंचाचा सन्माननायगाव दि 23 - नवनिर्वाचित सरपंचांना गावकऱ्यांनी निवडून देऊन गावचा प्रमुख कारभारी केल्यानंतर अशा गावमान्य नेतृत्वाला प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने भारतीय स्टेट बँक शाखा नायगावच्या वतीने तालुक्यातील विविध गावातील नवनिर्वाचित सरपंच महोदयांचा सन्मान करून वरिष्ठ अधिकारी राम मूर्ती,सौ. शिल्पा गिरबिडे जिंतुरकर, सिद्धार्थ कांबळे यांनी बँकेच्या विविध ग्रामीण योजनाविषयी सखोल मार्गदर्शन केले.

शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या दोन्हीही शाखेच्यावतीने सरपंच सन्मान दिवस आयोजित करण्यात आला,या कार्यक्रमात विचारपीठावर बँकेचे वरिष्ठ अधिकारी राममूर्ती साहेब,सौ.शिल्पा गिरबिडे जिंतुरकर मॅडम, शाखा अधिकारी सिद्धार्थ कांबळे साहेब यासह शेतकी अधिकारी, भास्कर चाचटकर, बँकेचे अधिकारी कर्मचारी केदार ताम्हणे, दीप्ती मॅडम, नागेश वडजे, सुधाकर संत्रे, व सौ. सी एस पी.महानंदा गायकवाड, राम मोरे, आयुब शेख,आनंद संत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील निमंत्रित नवनिर्वाचित सरपंच राहूल पाटील नकाते,बेटक बिलोली, शिवराज वरवटे ताकबिड, यशोदाबाई साहेबराव कांबळे पळसगाव, किरण कदम पिंपळगाव, युवराज लालवंडे लालवंडी, सुरेश पा. कदम खंडगाव, शोभाबाई शिंदे दरेगाव, फुलाबाई गणेश धसाडे सांगवी, सुधाकर डोईवाड डोंगरगाव, गणेश पवार होटाळा, शरद वडजे टेंभुर्णी, अशोक मोरे अंचोली, गणेश गाडले मुगाव, रमेश जाधव कांडाळा, विश्वनाथ मुंडकर मरवाळी, दत्ता पाटील गोदमगाव, प्रल्हाद बैस कोलंबी, भालके टाकळी,पुयड पाटील आदी नवनिर्वाचित सरपंचांचा बँकेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला .

एस बी आय या बँकेकडे दत्तक असलेल्या एकूण बारा गाव कर्ज नुतनिकरण पुर्ण झाल्यामुळे गावातील ग्रामपंचायती साठी छताचा पंखाही यावेळी बँकेच्या वतीने भेट देवुन या गावांना सन्मानित करण्यात आले, तर शिवराज वरवटे, शोभा शिंदे या सरपंचांनी बँकेविषयी शेतकऱ्याच्या काही अडचणी बाबत आपली मते मांडली ,यावेळी बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन करुन बँक आणि गाव पुढारी सरपंच यांच्यात दैनंदिन व्यवहारासाठी नव्या ग्रुपची निर्मिती करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे सुधाकर संत्रे यांनी केले तर आभार शिवाजी पा. शिंदे यांनी मानले.


--- बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि