नायगावात वेळ मर्यादा न पाळणाऱ्या दुकान दारांवर पोलीस बंदोबस्तात दंडात्मक कार्यवाही


नायगाव दि 19 - जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशा प्रमाणे सायंकाळी 5 वाजता दुकान बंद न करणाऱ्या व आदेशाचे पालन न करणाऱ्या नायगाव येथील दोन दुकानांना दंड लावून रुपये 15000 वसूल करण्यात आले आहेत.

नायगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व व्यावसायिकांनी काटेकोर नियमाचे पालन करावे यासाठी नगर पंचायत,महसूल,व पोलीस प्रशासन जिकीरीचे प्रयत्न करीत आहेत.नायगाव नगर पंचायतीकडून सोशल मीडिया,कर्णे, भोंगे लावून शहरात सर्वत्र नियमावली बाबत सूचना दिली जात आहे, तरीही नफेखोरीस चटावलेले काही व्यापारी शटर बंद करून वरून कीर्तन व आतून तमाशा या धर्तीवर व्यवसाय रेटतांना दिसत आहेत.

पृथ्वी कलेक्शन या कापड दुकानात बंद शटर च्या मध्ये व्यवहार चालू असल्याची माहिती नगरपंचायत प्रभारी मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर याना कळताच ते स्वतः नगर पंचायतचे पथक घेऊन दुकाना समोर गेले असता अनेकदा सूचना देऊनही करून ही शटर काढले नाही.

भोसीकर यांनी नायगाव मध्ये बहुचर्चित सिंघम म्हणून सध्या जोमाने कार्य करीत असलेले सपोनि भीमराव कांबळे यांना बोलावून घेतले ,कांबळे यांनी एन्ट्री होताच पृथ्वी कलेक्शन चे शटर तात्काळ उघडे झाले,शटर काढल्या नंतर प्रशासनाच्या नियमानुसार 10 हजार रु दंड लावण्यात आला तसेच सुगावकर हार्डवेअर हे दुकानही वेळे नंतर चालू ठेवल्या बद्दल त्यास 5 हजार दंड वसूल करण्यात आला आहे.

या प्रकाराने इतर छुप्या स्वरूपात दुकान चालवणाऱ्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दुकान बंद करायची वेळ झाली की शहरातील दुकान मालक कांबळे यांच्या एन्ट्री च्या भीतीने दुकाने पटापट बंद करत आहेत, या कारवाईत मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर, सपोनि भीमराव कांबळे यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक , कर्मचारी कोलमवार व नगरपंचायत चे कर्मचारी हजर होते


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि