नायगाव येथील चिद्रावार ड्रेसेसला 15 हजार रुपये दण्ड,एकूण 17 हजार रुपयांची दण्ड वसुली


नायगाव दि 15 - नायगाव येथे प्रसिद्ध व्यापारी प्रतिष्ठाण असलेल्या चिद्रावार ड्रेसेसला विना परवानगी कापड विक्री केल्याबाबत 15000 रुपये दण्ड तर गुरुकृपा होम अप्लायन्सेस यांचे कडूनही 2000 रुपयांचा दंड नायगाव नगर पंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कार्यवाहीतुन वसूल करण्यात आला आहे.

दिनांक 14 एप्रिल आंबेडकर जयंती दिनी नायगाव शहरात सकाळ पासूनच कापड व इतर खरेदी साठी मार्केट जोमाने चालू झाले होते केवळ नगर पंचायतच्या दुर्लक्षित पणा मुळे तर नायगाव चे तहसीलदार यांच्या भोंगळ कारभारामुळे सध्या लागू असलेल्या प्रतिबंधात्मक नियमावलीचे उल्लंघन करण्याचे प्रकार वाढत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे, जिल्हाधिकारी यांचा अचानक नायगाव दौरा येथील कोविड सेंटर पहाणी साठी आला आणि संबंधितात धावपळ सुरू झाली.

येथील नगर पंचायतचे बापुलें व त्यांचे सहकारी,शिवाय नायगाव पोलीस ठाण्याचे भीमराव कांबळे आणि त्यांचे सहकारी यांच्या पथकाने बसस्थानका पासून कार्यवाहीची सुरुवात केली, भोंग्यातून सुरू असलेली दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. या नुसार काहींनी बंद केले तर काहींनि नेहमीच्या सवयी प्रमाणे पुढून शटर बंद व पाठीमागुन दुकान चालूच ठेवली.येथील चिद्रावार ड्रेसेस चे मालक व कापड असोसीएशनचे अध्यक्ष सचिन चिद्रावार यांनी त्यांचे दुकान चालूच ठेवल्याची माहिती मिळाली.पथकाने आपला मोर्चा तिकडे वळवला व दुकानातील अनेक ग्राहकांना बाहेर काढले , कांबळे यांनी दुकानातील मुनीमाना पोलिसी प्रसाद दिल्यामुळे घाबरलेल्या मुनीमानी पळ काढला.या नंतर 15000 रु दण्ड नगरपंचायती ने वसूल केला.तर गुरुकृपा होम अप्लायसेस यांनाही 2000 रु दण्ड आकरण्यात आला,या मोहिमेत एकूण 17000 दण्ड वसूल केला.

नायगाव येथे सध्या कापड दुकानदारांनी पुढून शेटर बंद व पाठी माघून ग्राहकांच्या रांगा लावून खरेदी विक्री चालवली असून या प्रकाराने कोरोना च्या संख्येत लाक्षणीय वाढ होऊन सुद्धा पैसा कमावण्याच्या नादात जीव गमावण्याची कठोर भूमिका कापड दुकान दार आवलंबीताना दिसत आहेत. काही कापड दुकानदार व मुनिमाना कोरोना होऊन सुद्धा दुकाने सुरूच ठेवण्याचा प्रकार चालूच आहे.

या विषयात नगरपंचायत प्रशासन कमकुवत ठरत असून जिल्हाधीकारी शहरा बाहेर पडताचं पुन्हा दुकाने पूर्ववत चालू झाली असे एका व्यापाऱ्याने बोलून दाखवले.काही दुकानदार नगरपंचायत पथकातील कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देऊन कार्यवाहीची माहिती मिळवून त्या माहितीच्या आधारावर दुकाने चालवत असल्याचेही समोर येत आहे.या पूर्वी पृथ्वी कलेक्शन या कापड दुकानाला 10 हजार दण्ड लावूनही हे दुकान पाठीमागून चालूच राहत आहे.यांच्या खरेदी साठी येणारे ग्राहक त्यांची वाहने लांब लावून खरेदी चे प्रकार जोमाने सुरू आहेत, ज्या दुकानांना पाठी मागुन पर्यायी रस्ता नाही ते शटर किंचित उघडून व्यवहार चालवत आहेत, मालक बाहेर दुसऱ्याच्या दुकाना समोर बसत आहेत.संचार बंदी असो की लॉकडाऊन कापड व्यापारी मात्र आपला जीव पणाला लावून लाखोंचा व्यापार करत आहेत व नियमावलीचे उल्लंघन करतांना दिसत आहेत.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि