मांजरम येथे शेतकऱ्याची खोपी व किमती साहित्य जळून खाक,अडीच लाखाचे नुकसान


नायगाव दि 19 - मांजरम येथील शेतकरी माधवराव बापूराव शिंदे पंढरपुरे यांच्या खोपीला रविवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत त्यांच्या खोपीत असलेले 2 हेक्टर चे ठिबक संच,एक तुषार संच, बैलगाडी व इतर शेती उपयोगी सामान जळून खाक झाले आहे. सदर आग शर्टसर्किट ने लागल्याचा प्राथमिक अंदाज असून सुदैवाने स्वतः शिंदे व त्यांचे कुटुंबीय यावेळी गावाकडे गेले होते तसेच त्यांचे बैल झाडा खाली असल्याने जीवित हानी झाली टळली.

या बाबत अधिक वृत्त असे की मांजरम ता नायगाव येथील शेतकरी माधवराव शिंदे यांची शेती गावच्या पश्चिम दिशेला आहे.त्यांच्या शेतात जनावरां साठी व शेती उपयोगी साहित्य ठेवण्यासाठी एक खोपी होती याच खोपी जवळून एमएसइबी ची वीज लाईन गेली आहे. ती नादुरुस्त झाली होती,दुरुस्ती करून वीजप्रवाह सुरू केल्यानंतर त्या तारेतून ठिणग्या उडाल्या व त्यातील एक खोपीवर पडून आग लागली असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

आग लागल्या नंतर येथील दशरथ शिंदे यांनी तलाठी शहाणे व मंडळ अधिकारी पांडे यांना फोन केला पण दोघांचेही फोन बंद आसल्याने अखेर खुद्द तहसीलदार शिंदे यांनाच कळवले परन्तु लगेच संबंधितांना पाठवतो असे उत्तर मिळूनही या नुकसानीचा दुसऱ्या दिवशी सोमवारी तलाठी एस ए शहाणे यांनी पंचनामा केला.

या आगीत ठिबक सिंचन साहित्य 120,000,तुषार संच 32 हजार,बैल गाडी 45 हजार, शेतीची औजारे 45 हजार असे एकूण अडीच लाखाचे साहित्य जळून भस्मसात झाले आहे. आधीच नापिकी व कोरोनाच्या संकटकाळात शर्टसर्किट ची ही आग सदरील शेतकर्यासाठी कर्दनकाळ ठरली आहे.या नुकसानीबाबत वीज मंडळाने व शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि