नायगावात शनिवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग, सहा दुकाने व एक दवाखाना जळून खाक

आगीत 38 लाखाहुन अधिक किंमतीच्या मालमत्तेचे नुकसान,

-------------------------------------------------------

नायगाव दि 14 - नायगाव येथे शनिवारी मध्य रात्री अचानक लागलेल्या आगी मध्ये सहा दुकाने व एक दवाखाना जळून भस्मसात झाला आहे

नायगाव शहर गाढ झोपेत असताना ही आग लागली, आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते, या अग्नितांडवात 38 लाखाहुन अधिक किंमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे,

या घटनेची माहिती मिळताच नांदेड जिल्ह्याचे खा.प्रताप पाटील चिखलीकर,व माजी आ.वसंतराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

नायगाव येथील मुख्य रस्त्यावरील डॉ हेडगेवार चौका पासून हाकेच्या अंतरावर असलेले माजी आ.वसंत चव्हाण यांचे बंधू डॉक्टर विश्वास व्यंकटराव चव्हाण यांचे हॉस्पिटल या आगीत पूर्णता जळाले आहे, आगीत 9 लाख 81 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे तर त्यांचेच बंधू श्रीधर व्यंकटराव पाटील चव्हाण यांच्या मेडिकल दुकानातील पूर्ण औषधी व फर्निचर जळाले आहे,त्यांचे जवळपास 21 लाख 20 हजार रुपयांचे साहित्य भस्मसात झाले आहे.

याच रांगेतील शेजारचे शिवराज समृत वडपत्रे यांचे गणेश लॉन्ड्री दुकान,व शिवा ग्राफिक्स ही दुकानेही जळाली असून त्यात त्याचे 2 लाख 47 हजार रुपयांचे नुकसान झाले.किशन माधवराव कुंचेलवाड यांचे साई हेअर कटिंग सलूनसुध्दा या आगीत पूर्णता जळाले आहे, त्यांचे 1लाख 84 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.त्याच्या शेजारीच असलेले पंढरी गणपत वडपत्रे यांच्या विनोद लाँड्री चे ही आगीत 46 हजार रुपयांचे नुकसान झाले, या दुकाना लगतच असलेल्या महंमद आरिफ महंमद आजम बागवान यांचे न्यू रजा ज्यूस सेंटर चेही 3 लाख 36 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सदर आग शनिवार दिनांक 13 मार्च 2021रोजी मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज आहे. लाईनमन ला पोलीस यंत्रणेंकडून फोन गेला तेव्हा वीजपुरवठा बंद करण्यात आला.सारे शहर गाढ झोपेत असतांना ही आग लागल्यामुळे आटोक्यात आणण्यासाठी खूपच उशीर झाला, विशेष म्हणजे नांदेड हैद्राबाद मार्गावरून जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हर च्या लक्षात आल्यानंतर त्याने डॉ हेडगेवार चौकात आपले वाहन उभे करून सराफा लाईन मधील गस्तीवर असलेल्या गुरख्यास ही माहिती कळवली व त्यानंतर पोलिसांना ही खबर मिळाली, पोलिसांनीच दुकानावरील फोन क्रमांक पाहून त्या त्या मालकांना घटनेची माहिती कळवली

बऱ्याच वेळानंतर आग विझवण्या साठी नायगाव ,नांदेड, येथून अग्निशमन वाहने आली, मेडिकल दुकान व दवाखाण्याचे शटर लवकर न निघाल्याने आगिने रौद्र रूप धारण केले होते.या मुळे दुकानातील सोनोग्राफी मशीन,मेडिकल औषधी साहित्य,दवाखान्याची फर्निचर ,कॅबिन, महागड्या वस्तू व महत्वाची कागदपत्र जळून खाक झाले.

सदर आगीची माजीती मिळताच तलाठी बी एस राठोड,पो.नि आर एस पडवळ यांनी घटना स्थळा ला भेट देऊन नुकसानिचा पंचनामा केला,


**************************************************

एका खाजगी कार्यक्रमासाठी नायगाव शहरात खा.प्रताप पाटील चिखलीकर हे आले होते, या आगीत नुकसानग्रस्त झालेले डॉ विश्वास चव्हाण व श्रीधर चव्हाण यांचे ते नात्याने मावसकाका आहेत, आगीची माहिती मिळताच

त्यांनी तत्काळ धाव घेतली खा चिखलीकर यांच्यासह चव्हाण परिवाराचे मोठे बंधू माजी आ वसंतराव चव्हाण,माजी उप महापौर आनंद चव्हाण आदिनीही घटनास्थळी धाव घेऊन नुकसानग्रस्तांना दिलासा दिला

**************************************************


----बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि