गडगा येथील अवैध धंदे जोरात,पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देण्याइतपत अवैध धंदेवाल्याची मजल पोचली

नायगाव दि 06 - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रशासनाने जिल्ह्यात संपूर्ण दिवसा निर्बंध व रात्री संचारबंदी लागू केली आहे , नायगाव तालुक्यातील गडगा हे गाव मात्र जिल्ह्याबाहेर किंवा परराज्यातील आहे की काय असा प्रश्न विचारण्याजोगी परिस्थिती दिसून येत आहे,गडग्यात खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत.अवैध दारू विक्री सोबतच इथे रस्त्यावर मटका बुकी उघडपणे फिरून ,किंवा एक दोन ठिकाणी आडोसा घेऊन मटका जोमाने मटका चालवत आहेत.

गडगा येथे मांजरम रस्त्यावर देशी दारू दुकान आहे.लाॅकडाऊन मुळे ते बंद जरी असले तरी अवैध दारू विक्री करणाऱ्या हस्तकांना मागील दाराने पाहीजे तेवढी दारू मिळते, त्यामुळे दारूचा नियमित पुरवठा सुरू आहे.अवैध दारू विक्री करणाऱ्या हस्तकाने सगळ्या यंत्रणेची नजरबंदी केली की काय अशा प्रश्न गोरगरीब कुटुंबातील पीडिताकडून विचारल्या जात आहे

या गावात यापूर्वी अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल असताना देखील एक विशिष्ट हस्तक पोलीसांचा मदतनीस म्हणून मोठी भूमिका पार पाडतो.कुणाला मध्ये टाकायचे अन् कुणाला काही न करता बाहेर काढायचे याचे तंत्र आपल्याला अवगत आहे त्यामुळे माझे कुणीच काही करू शकत नाही असे तो खुलेआम पणे सांगत आहे.अवैध धंद्याची वस्तूनिष्ठ बातमी छापणाऱ्या पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत या अवैध धंदेवाल्याची मजल गेली आहे.

याच हस्तकासोबत गडगा येथील जय भवानी धाब्यावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रात्री पोहेकाॅ.डी.एस.वडजे हे देशी दारुची पार्टी रिचवतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला व या प्रकरणात जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी बहुचर्चित वडजेना तडकाफडकी निलंबितही केले होते.परंतु वरिष्ठांच्या या कारवाई नंतरही गडगा परीसरातील अवैध धंदे बंद होण्याऐवजी जोमाने वाढतच चालले आहेत.येथील अवैध दारू विक्री,मटका, जुगार, गुटखा विक्री असे अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी महीला वर्गाने करून ही उपयोग झाला नाही.बातमी आली की विक्री नसेल तिथे लुटुपटू धाड टाकायची व जिथे खरी विक्री सुरू तिथे रान मोकळे असे सूत्र पोलिसांनी अवलंबीले असल्याचे चित्र या भागात दिसत आहे,राजरोसपणे सुरू असलेल्या दारू मटक्यामुळे अनेक कुटुंबाची धूळधाण होत असून ,या अवैध धंद्याचा सुळसुळाट पूर्णपणे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन अर्थपूर्ण अर्थाने निमूट आहे किंवा एखाद्या राजकीय हस्तीच्या दबावामुळे मूग गिळून गप्प आहे असा प्रश्न पीडित महिलांकडून तीव्रतेने विचारल्या जात आहे,


--- बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि