निलंबित ग्रामसेवक पठाण यांच्यावर असलेल्या २० लाखांच्या अपहार आरोप प्रकरणी विधानसभेत प्रश्न

गुन्हा दाखल करण्याचा हालचालीला वेग,गटविकास अधिकाऱ्यांचाही दुजोरा

*************************************************

नायगाव दि 22- तालुक्यातील गडगा ग्राम पंचायतीचे निलंबीत व वादग्रस्त ग्रामसेवक एम.ए. पठाण यांनी आपल्या गडगा येथील प्रशासन काळात 20 लाखांचा अपहार केल्याबाबतच्या आरोपाबद्दल शासनदरबारी कारवाईसाठी हालचाली वेगात सुरू झाल्या असून संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे

पठाण यांनी गडगा प्रामपंचायती मध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या निधीपैकी तब्बल २० लाखांच्या वर रक्कमेचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे, गटविकास अधिका-यानी त्यांच्यावर यापूर्वीच निलंबनाची कारवाई केली असली तरी सदरचे प्रकरण आता थेट विधानसभेत पोहचले आहे, या भ्रष्ट ग्रामसेवकाला पाठीशी घालणा-या पंचायत समितीतील संबधित विस्तार अधिकारी व इतर अधिकाऱ्यांचे धाबे आता दणाणले असून,केवळ एकाचेच निलंबन करून हे मोठे प्रकरण दडपविण्याच्या प्रयत्नावर पाणी फिरण्याची शक्यता पुढे आली आहे, संबंधितावर गुन्हा नोंद करण्याच्या हालचालिंना वेग आला आहे.

मागच्या पाच वर्षांपासून गडगा ग्रामपंचायतच्या सरपंच पुत्र व ग्रामसेवकांनी शासकीय निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. या भागात मध्यंतरी तात्पुरत्या प्रशासनासाठी ग्रामपंचायतीची सूत्रे हाती घेणाऱ्या प्रत्येक ग्रामसेवकाने गैरव्यवहार व भ्रष्टाचार करण्याचा सपाटाच लावला होता . त्यामुळे पाणी पुरवठा योजनेसह १४ व्या वित्त आयोग आणि दलित वस्तीच्या कामातील अनियमितता व अर्थिक अपहारप्रकरणी यापूर्वी पाच ग्रामसेवकावर गुन्हे नोंद झालेआहेत.तर आता सहाव्या क्रमांकाचे ग्रामसेवक पठाण हे देखील गुन्हा दाखल होण्याच्या धोक्यात दाखल झाले आहेत, त्यांच्यावर गुन्हा झाल्यास भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकांची संख्या अर्धा डझनावर पोचणार आहे.

सूत्रांकडून कळालेल्या माहितीनुसार ग्रामसेवक पठाण यांनी सदरील अपहार तर केलाच पण चौकशी करण्यासाठी गेलेल्या विस्तार अधिकाऱ्यांना अभिलेखेही उपलब्ध करून दिले नाहीत. तर दुसरीकडे याप्रकरणी तातडीने चौकशी व्हावी यासाठी गटविकास अधिकारी प्रभाकर फाजेवाड यांनी प्रयत्न केले पण पुरावेच उपलब्ध नसल्याने हे प्रकरण प्रलंबित राहिलें. त्यामुळे या प्रकरणी चौकशी व गुन्हा दाखल होण्यासाठी बराच विलंब झाला. सदर प्रकरणी गटविकास अधिकार्यांनी ४ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करावा व अपहार करण्यात आलेली रक्कम प्रचलीत नियमानुसार वसूल करन्याचे संकेत असूनही केवळ निलंबनाची कारवाई करून पुढील प्रक्रिया ठप्प झाल्यामुळे सदर प्रकरण नायगावचे आ.पवार यांनी आता उचलून धरले आहे.

आपल्या भ्रष्टाचाराचा डंका आता विधानसभेत गाजणार असल्यामुळे ग्राम पंचायतीतील ग्रामसेवक व पंचायत समिती मधील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून वरिष्ठांना उतर देण्याबरोबरच फौजदारी कारवाई करण्याच्या हालचालीनाही वेग आला आहे.

पठाण यांच्या कारभारात सहभागी असलेल्या साथीदारावर काय कार्यवाही होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

*************************************************

गुन्हा दाखल होणार - गटविकास अधिकारी फाजेवाड

सदर प्रकरणी गुन्हा नोंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी कबुली देत गटविकास अधिकारी प्रभाकर फाजेवाड यांनी पठाण यांनी गैरव्यवहार केल्याच्या आरोपाला दुजोरा दिला.दिनांक 22 किंवा 23 रोजी आवश्यक कागदपत्र मिळाले की गुन्हा दाखल होईल असेही त्यांनी सांगितले.

*************************************************


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि