गडग्याचे वादग्रस्त निलंबित ग्रामसेवक एम ए पठाण यांच्यावर लाखोंच्या अपहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

*************************************************

गडगा ठरले तब्बल अर्धा डझन भ्रष्ट ग्रामसेवकांची हजेरी लागलेले गाव

*************************************************

नायगाव दि 27 -गडगा ग्राम पंचायतीचे निलंबीत वादग्रस्त ग्रामसेवक एम.. पठाण यांनी आपल्या नोकरीच्या काळात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतील तब्बल १७ लाखांहुन अधिक रक्कमेचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे,गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई या पूर्वीच केली असली तरी सदरचे प्रकरण विधानसभेत पोहचल्याने या भ्रष्ट ग्रामसेवकाविरुद्ध संबधित विस्तार अधिकारी एस.आर.कांबळे यांच्या फिर्यादीवरून २६ फेब्रुवारी च्या रात्री उशिरा नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाआहे. मागच्या पाच वर्षांपासून गडगा ग्रामपंचायतीत सरपंच पुत्र व ग्रामसेवकांने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. येथे आलेल्या प्रत्येक ग्रामसेवकाने गैरव्यवहार व भ्रष्टाचार करण्याचा सपाटाच लावला होता . त्यामुळे पाणी पुरवठा योजनेसह १४ व्या वित्त आयोग आणि दलित वस्तीच्या कामातील अनियमितता व अर्थिक अपहारप्रकरणी यापूर्वी पाच ग्रामसेवकावर गुन्हे नोंद झालेआहेत.तर आता सहाव्या क्रमांकाचे ग्रामसेवक एम.ए.पठाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाल्याने अर्धा डझन ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झालेले गडगा गाव अशी ख्याती झाली आहे . ग्रामसेवक एम ए पठाण यांनी अपहार तर केला पण चौकशी करण्यासाठी गेलेल्या विस्तार अधिकाऱ्यांना अभिलेखेही उपलब्ध करून दिले नाहीत. तर दुसरीकडे तातडीने चौकशी होण्यासाठी गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड यांनी प्रयत्न केले पण पुरावे उपलब्ध नसल्याने प्रकरण प्रलंबित राहिलें. त्यामुळे या प्रकरणी चौकशीचाच फार्स सुरू होता, प्रत्यक्ष गुन्हा दाखल होण्यासाठी बराच विलंब झाला. दिनांक १९ १० २०२० रोजी सरपंच चंद्रकला माधवराव कोंडलवाडे यांनी सदर प्रकरणी आपल्या निराक्षरतेचा गैरफायदा घेत एम ए पठाण यांनी गटविकास अधिकारी नायगाव यांच्या कडे ९६ हजार च्या चेक ला २९६०० केले,व असा उपद्व्याप सात ते आठ करून निधी अपहृत केला अशी तक्रार दिली होती. या वरून गट विकास अधिकारी प.स. नायगाव च्या आदेशावरून विस्तार अधिकारी कांबळे हे चौकशी कामी गेले असता आठ वेळा वेगवेगळ्या एजन्सीच्या नावे एकूण 17 लाख 85 हजार 343 रु उचलल्याचे निदर्शनास आले नंतर याची जवाबदारी माझी आहे असे संबंधिताने लिहून दिल्या नंतर.तसा अहवाल सादर झाला. गट विकासअधिकार्यांनी ४ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार कारवाई करुन ग्रामसेवकाचे निलंबन केले, परंतु अपहार करण्यात आलेली रक्कम प्रचलीत नियमानुसार वसूल करन्याची प्रथा असूनही पठाण यांच्या वर केवळ निलंबनाची कारवाई झाल्यामुळे सदर प्रकरण आ.राजेश पवार यांनी विधानसभेत उचलून धरले. त्यामुळे या भ्रष्टाचारी साखळीत सामील असलेले ग्रामसेवक व पंचायत समिती मधील संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते, वरिष्ठांना उतर देण्याबरोबरच फौजदारी कारवाई करण्याच्या हालचालीस वेग आला . व २६ फेबुरवारी च्या रात्री ११वाजून २० मी वाजता एम ए पठाण यांच्या विरुद्ध फिर्यादीवरून भादवी 1860 प्रमाणे गु.र.न.045 प्रमाणे 420,409,467,468,471 कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय एस एस बाचावार करीत आहेत.

---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि