पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून जिल्हयाला तब्बल 566 कोटींचा अतिवृष्टी निधी मंजुर

************************************************

बळीराजाच्या दुःखावर शासनाची मदतीची फुंकर

************************************************

नांदेड दि.11- कधी नव्हे तो मागील खरीप कालावधीत भरघोस हंगामाची स्वप्ने पाहणाऱ्या बळीराजावर अस्मानी संकटाने अचानक हल्लाबोल केला ,जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर या हल्ल्यामुळे भीक नको पण कुत्रे आवर म्हणण्याची वेळ आली,पिके तर जाऊद्याच पण शेत जमीन,घर,गुरे ढोरे व स्वतःचे व परिवाराचे संरक्षण कसे करावे अशी विवंचना या अतिवृष्टीमुळे निर्माण झाली होती,हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने ओरबाडून घेतला होता,

जून ते ऑक्टोबर दरम्यान जिल्हयात वारंवार झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या बाधित शेतकर्‍यांना सरकारी मदत देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. जिल्हयातील जास्तीत जास्त बाधित शेतकर्‍यांना ही अतिवृष्टीची मदत मिळावी यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण तात्काळ विशेष प्रयत्न सुरू केले होते. त्याचेच फलित म्हणून पहिल्या व दुसरा टप्पा मिळून  जिल्हयातील शेतकर्‍यांसाठी तब्बल 566 कोटींची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.

या वर्षी नांदेड जिल्हयात विक्रमी पाऊस पडला.  जिल्हयाच्या विविध भागात वारंवार झालेली अतिवृष्टी व त्यातून अनेक छोटया-मोठया नद्या व नाल्यांना आलेला पूर यामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यासोबतच अनेक गावांमध्ये घरपडी झाली.जनावरांचे गोठे वाहून गेले. अनेक जनावरे दगावली. त्यामुळे जिल्हयातील शेतकरी हवालदिल झाला होता. या पार्श्वभूमीवर शासनाकडून मदत मिळावी अशी प्रकर्षाने मागणी होत होती.

शेतकर्‍यांचे झालेले नुकसान भरपाई करण्यासाठी शासनानी दोन हेक्टरच्या मर्यादित जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी दहा हजार तर बारमाही पिकांसाठी  प्रती हेक्टरी 25 हजार मदतीची घोषणा केली होती. नांदेड जिल्हयातील शेतकर्‍यांना जास्तीतजास्त मदत मिळावी यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण प्रयत्नशील होते. महसूल स्तरावर वारंवार सर्व्हे करुन शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनास त्यांनी केल्या होत्या.

या सर्व बाबींचा परिणाम म्हणून 9 नोव्हेंबर 2020 रोजी निघालेल्या शासनाआदेशानुसार  पहिल्या टप्प्यात जिल्हयातील शेतकर्‍यांना 284 कोटी  तर 7 जानेवारी 2021 रोजी निघालेल्या नव्या आदेशानुसार दुसर्‍या टप्प्यात 282 कोटी असे एकूण 566 कोटी रक्कम मदत निधी म्हणून प्राप्त झाला आहे. या निधी वाटपाची प्रक्रिया जिल्हाधिकार्‍यांमार्फत सुरु झाली असून लवकरच ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना

पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे मोठया प्रमाणात आर्थिक मदत मिळणार आहे,विशेष म्हणजे राज्यात नांदेड जिल्हयाला सर्वाधिक मदत निधी मंजूर झाला आहे. याचे सर्व श्रेय पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना असून त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. 


---श्रीकांत देव

मुख्य संपादक, नांदेडवैभव

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि