नायगाव च्या तहसील कार्यालयात सोमवारी कडक पोलीस बंदोबस्तात मतमोजणी

*************************************************

पुनर्मतदान झालेल्या खैरगाव येथे ४५८ पैकी ३५७ मतदारानी हक्क बजावला

**************************************************

नायगाव दि 17- नायगांव तालुक्यातील ६३ ग्राम पंचायतीसाठी २०१ मतदान केंद्रावर ९९१७६ मतदारांपैकी ८०८६२ मतदारांनी आपला हक्क बजावला असून सोमवारी दि १८ रोजी सकाळी ९ वा तहसील कार्यालय नायगाव येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे, मत मोजणी साठी १२ टेबल लावण्यात आले आहेत.पहिल्या क्रमांकावर ग्राम पंचायत नरसी व बेटकबेळी एक या गावाची मतमोजणी होणार असून 10 वाजे पर्यंत ह्या ग्रा.प.चा निकाल लागेल असे तहसीलदार गजाननराव शिंदे यांनी सांगितले.

ग्राम पंचायत निवडणुकीत तालुक्यात एकूण ८०,८६२मतदान झाले असून त्यामध्ये पुरुष ४२६५९ तर स्त्रिया ३८२०३ यानुसार मतदानाचा हक्क बजावण्यात आला आहे. एकूण ८१.५३ टक्के मतदान झाले असून यावेळी १०५७ उमेदवार रिंगणात होते. खैरगाव येथे तांत्रिक अडचणी मुळे १७ जानेवारी रोजी फेर मतदान झाले … सर्व उमेदवाराचे भवितव्य मतदान यंत्रा मध्ये बंद झाले आहे.ते १८जानेवारी रोजी मतमोजणी द्वारे उघड होणार आहे. कुणाचे नशीब उजळणार व कुणाचे नाही हे निकाला नंतर कळेल,

निवडणूक प्रशासनाने मतमोजणी साठी १२ टेबलची व्यवस्था झाली असून १२ झोनल अधिकारी,१२मास्टर ट्रेनर, व १२सेवक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मत मोजणीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे सकाळी ९ ते १० च्या दरम्यान नरसी च्या सर्व जागेची व बेटकबेळी च्या एका जागेची मोजणी होणार आहे. सकाळी १०वा.शेळगाव गौरी भोपाळा,धुपा,होटाळा ,१०वाजून १०…२० मिनिटाला कुंचेली टाकळी त.मा.कांडाळा, धानोरा,येथील मतमोजणी होणार आहे.१०…४०मी.मुगाव, खडगाव, नावंदी,११वा.केदारवडगाव,आलुवडगाव, मोकासदरा,टाकळी , ११…२० वा.गडगा,मांजरम,दरेंगाव, ११…४० वा रातोळी, कोलंबी,कुष्णुर, दुपारी १२…१० वा.नरंगल अंचोली सोमठाना,कहाळा बु., १२…३० वा हिपरगा,राणसुगाव,बेंद्री, कार्ला त.मा.,१२.५० वा.काहाळा खु.पाटोदा त.ब.,रूई बु.१.१०.वा.सावरखेड मनूर त.ब. रुई बु.,१…३० वा.इकळी मोर,मुस्तपूर, कोठाळा, औराळा,१…५०वा.हंगरगा,सालेगाव,मेळगाव,धनज २…१० वा सांगवी राहेर बळेगाव,इकळिमाळ,२.३० वा देगाव,शेळगावछत्री,पळसगाव,डोंगरगाव,२…५० वा राजगडनगर,कोकलेगाव,वंजरवाडी हुस्सा,तर३.१०.मी.खैरगाव,गोधमगाव,बरबडा येथील मतमोजणी होणार आहे. तास भर पुढे मागे झाले तरी सर्व ग्रामपंचायतींचे निकाल चार ते पाच वाजे पर्यंत हाती येतील असे अववल कारकून आलमवाड यांनी सांगितले

मतमोजणीच्या जागी कडेकोट पोलीस बंदोबस्त

नायगाव तालुक्यातील ग्रा.प.निवडणुकीची मतदानाची मतमोजणी उपविभागीय निवडणूक निरीक्षक ओमप्रकाश यादव तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव येथील तहसील कार्यालयात सोमवारी होत आहे, मतमोजणी स्थळावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात झाला आहे, विभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर बल्लाळ यांनी अनुचित प्रकार घडू नये याकरिता दक्ष निगराणी ठेवली आहे, नायगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमाकांत पड़वळ, सपोनि भीमराव कांबळे,रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरी, कुंटुर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण, या तीन पोलीस ठाण्यासह बाहेरून आलेले पोलीस कर्मचारी सतर्कतेने काळजी घेणार आहेत

**************************************************

खैरगाव च्या मतदारांची चांदी..??

खैरगाव येथे वार्ड क्र.3 च्या उमेद्वाराच्या नावा समोर चिन्ह नसल्याने पुनर निवडणूक आज दु १७ जानेवारी रोजी झाले. ४५८ पैकी ३५७ मतदारांनी आज मतदान केले . १५ जानेवारी रोजी झालेल्या मतदानापेक्षा आज १ मतदान कमी झाले असे कळले पुनर मतदान प्रक्रियेत मतदारांची चांदी,तर उमेदवारांची मात्र बरबादी झाली अशी चर्चाही दबक्या आवाजात ऐकावयास मिळाली

****************************************************


---बाळासाहेब पांडे, मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि