ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सूसज्ज -तहसीलदार गजानन शिंदे

*******************************************

१०६२ उमेदवार रिंगणात ९९७२० तर

मतदार मतदानाचा हक्क बजावणार

*******************************************

नायगाव दि 13- येत्या १५ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या ग्राम पंचायत निवडणुकीसाठी प्रशासन स्तरावर नियोजन झाले आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणूक पार पाडण्यासाठी सुसज्ज असल्याचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले आहे. ७२ पैकी ५ ग्रा.प.व इतर ग्रामपंचायतीच्या काही जागा अशा एकूण ९५ जागा बिनविरोध निघाल्या आहेत,उर्वरित जागेसाठी १०६२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून या साठी ९९७२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

नायगाव तालुक्यातील एप्रिल २०२० व डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७२ गावातील ६८ ग्राम पंचायत निवडणुकीकरिता सर्वत्र संगणकीकृत पद्धतीने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नायगाव तालुक्यामध्ये माहे २०२० डिसेंबर या कालावधीमध्ये एकूण ६८ ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली, ६३ ग्रामपंचायत मतदारसंघांमध्ये ५२,०३२,पुरुष ४७६८८ स्त्री असे एकूण ९९७२० मतदार आपलामदानाचा हक्क बजावणार आहेत. सदर मतदान पार पाडण्यासाठी १७ निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणुक, निर्णय अधिकारी १७ यानुसार एकूण ३४ निर्णय अधिकारी यांची नियुक्ती झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विविध निवडणूक कक्षा ची पथके स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांना समाविष्ट करण्यात आले असून १४ झोनल अधिकारी नियुक्तीचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

सदरील ग्रामपंचायतींच्या एकूण मतदान केंद्रांवर ९०० च्या वर कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून सदरील कर्मचाऱ्यांचे नियुक्त आदेश काढण्यात आले असुन, पहिल्या प्रशिक्षणामध्ये गैरहजर असणाच्या कर्मचाऱ्याना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

ग्रामपंचायत स्तरावर एकूण १०६२ उमेदवारांपैकी पन्नास टक्के महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. सदरील निवडणूक कामाकरिता महसूल यंत्रणा पूर्णतः सज्ज असून आजपर्यंत सर्व अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. जानेवारी रोजी दुसरे प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार असून सकाळी दहा ते एकपर्यंत व तसेच दुसरे सत्रात ईव्हीएम मशीन हाताळणी प्रशिक्षण दुपारी २ ते ५ वाजे पर्यंत घेण्यात आले.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा किंवा अनुपस्थित राहणे याबाबत तहसीलदार गजानन यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. सर्व जबाबदारी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार नवनाथ वगावाड नायब तहसीलदार नंदकुमार भोसीकर, नायब तहसीलदार लोंढे अववल कारकून आर आर आलमवाड शेख युनूस व सर्व कर्मचारी निवडणूक कामाकरिता सज्ज आहेत, अशी माहिती रोशनसिंग ग्रंथी, तसेच महसूलचे आंनमवाड व यांनी दिली आहे.तसेच तिसरे प्रशिक्षण १४ जानेवारी २०२१ रोजी सामाजिक न्याय भवन नायगाव येथे घेण्यात येणार असून, निवडणूक साहित्य वाटप केल्यानंतर ठरवून दिलेल्या मतदान केंद्रावर कर्मचारी रवाना करण्यात येणार आहेत


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि