मेळगाव येथे दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी 21 जनावर गुन्हे दाखल


नायगाव दि 23- नायगाव तालुक्यातील कुंटुर पोलीस ठाण्यांतर्गत मेळगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक वादा वरून दोन गटात वाद होऊन एकमेकाला लाथा, बुक्क्या व काठीने मारहाण केल्यावरून दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून एकूण एकवीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकित मेळगाव येथे एका गटाचे तीन उमेदवार व दुसऱ्या विरोधी गटाचे तीन उमेदवार निवडून आले होते .यापैकी दोन विरोधी उमेदवारांना समान मते पडल्यामुळे टॉस द्वारे निवडलेल्या उमेदवाराच्या गटाने ग्रामपंचायत ताब्यात घेतली. मात्र पराभूत झालेल्या उमेदवारांनी निवडून आलेल्या उमेदवाराच्या निवडणूक फार्मची चौकशी लावली,त्यात अतिक्रमण व शौचालय नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी पंचायत समिती येथून गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विस्ताराधिकारी यांना पाठवून दिले होते .

त्यानुसार ग्रामसेवक व विस्तार अधिकारी गावात येऊन चौकशी करत असताना उमेदवाराच्या घरा समोरील रस्त्यावर असलेल्या पायऱ्या तोडून टाकल्याचे आढळले, याबाबत उमेदवाराला विचारणा केली असता मी अतिक्रमण केले नाही सर हे काढले आहे. असे स्पष्टीकरण दिले, व आपल्याविरुद्ध तक्रार केल्याचा मनात राग धरून विजयी आलेल्या उमेदवाराने गावातील गैर कायद्याची मंडळी जमवली व दोन्ही गटात मारहाण झाली,

या मारहाणीत एका गटाच्या 10 व दुसऱ्या गटाच्या 11 अशा एकूण 21 जणांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी संबंधितांना न्यायालयात हजर केले अशी माहिती पोलिस स्टेशनचे सपोनि करीम खाँ पठाण यांनी दिली,सदर घटना दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता मेळगाव येथे घडली आहे

गुन्हा 80 /2021, कलम 324, 323 ,143, 147 ,149 ,294 ,आयपीसी 135 मुंबई पोलीस कायदा या अंतर्गत पोलिसांनी गुन्हे दाखल केले , प्रदिप माधव धसाडे, वय वर्षे 24 राहणार मेळगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विनोद आनंदराव शिंदे , मोहन दत्तराव शिंदे दत्ता रामराव शिंदे ,संतोष रामराव उर्फ राजाराम शिंदे ,आनंदा नागोराव शिंदे ,उद्धव देवदास नरवाडे ,गणेश/ बाळु मारोती शिंदे, शिवाजी रामराव नरवाडे व इतर दोन असे आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दुसऱ्या गटाचे फिर्यादी विनोद आनंदराव शिंदे यांनी गुन्हा नंबर 81 मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी 1 हनुमंत नारायण शिंदे, प्रदीप माधव धसाडे, ज्ञानेश्वर हनुमंत शिंदे, दत्ता हनुमंत शिंदे, माधव नागोराव धसाडे, उद्धव दिगंबर धसाडे ,वैजनाथ नारायण शिंदे , सुनील धसाडे, संदीप दिगंबर धसाडे ,अविनाश व्यंकटराव शिंदे, एकूण अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. असून या प्रकरणी 324 323 143,147,149,504 506 कलम,135 मुंबई पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.


---बाळासाहेब पांडे,मांजरमकर

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि