शासकिय रुग्णालयाच्या धर्तीवरच हैदरबाग रुग्णालयातही सुविधा उपलब्ध करुन देणार- ना.अशोकराव चव्हाण

नांदेड दि. 08 - शासकिय रुग्णालयात असलेल्या आरोग्य सुविधा हैदरबाग येथील मनपाच्या रुग्णालयातही उपलब्ध करुन देणार अशी ग्वाही पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दली आहे.

शहराच्या देगलुर नाका हैदरबाग येथील मनपाच्या रुग्णालयातील रुग्णवाहिका, एक्स रे व सोनोग्राफी मशीन  आदि  वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण सोमवार दि. 8 फेब्रुवार रोजी सायंकाळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे माजीमंत्री डी.पी.सावंत, काँग्रेसचे विधानपरिषदेतील प्रतोद आ. अमरनाथ राजुरकर, आ. मोहनराव हंबर्डे, महापौर मोहीनी येवनकर, उपमहापौर मसुद खाँन, स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सरिता बिरकले, माजी महापौर अ. सत्तार, नगरसेवक शेर अली खाँन,अब्दुल गफार,विजय येवणकर, रहिमखान, महापालका आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदिंची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना ना. अशोकराव चव्हाण म्हणाले की, या भागातील नागरिकांना शासकिय रुग्णालयात जाण्यापेक्षा त्यांना सुविधा हैदरबाग येथील मनपाच्या रुग्णालयात उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. रुग्णवाहिका, एक्स रे व सोनोग्राफी मशीन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यानंतरही आवश्यकते नुसार आणखी अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील यामुळे अन्य रुग्णालयात जाण्याचे गरज येथील रुग्णांना भासणार नाही.

आरोग्य, शिक्षण व मुलभुत सोयी सुविधा नांदेडकरांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच हज यात्रेसाठी जाणार्‍या यात्रेकरुंसाठी विमानसेवा असावी यासाठी आपला पाठपुरावा सुरु असल्याचे सांगत नांदेडच्या विकासासाठी निधीची कमतरता पडु देणार नाही आगामी काळात प्रलंबित विकास कामे पुर्ण करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. नांदेडकरांनी विकासासाठी आपल्यावर टाकलेला विश्वास असाच कायम ठेवावा विकासाची जबाबदारी आपली असल्याची ग्वाही ना. अशोकराव चव्हाण यांनी यावेळी दिली.

यावेळी आ. बालाजी कल्याणकर, नगरसेवक शेरअली खॉन आदिंनी विचार मांडले. तर प्रास्ताविक महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाणे यांनी केले. या कार्यक्रमास देगलूर नाका व परिसरातील नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती


---श्रीकांत देव

---मुख्य संपादक, नांदेडवैभव

Recent Posts

See All

नायगाव येथे भरधाव ट्रक च्या धडकेत एक युवक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

नायगाव दि 12 - नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव शहरातील दत्तनगर भागात भरधाव ट्रकने एका मोटारसायकलला पाठी मागुन जबर ठोस दिल्यामुळे पाठी मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर समोरील चालकालाही ज

शेतकऱ्यांना मोफत गाळ काढून देण्यासाठी व्ही.पी.के समूह सरसावला..

माजी जि.प. सदस्य मारोतराव कवळे गुरुजी यांचे शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन ************************************************** नायगाव दि 11 - माजी जिप सदस्य, उमरी, नायगाव ,धर्माबाद तालुक्यातील सक्रि